शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Madhya Pradesh Election : सरकार आल्यावर घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ; 'या' राज्यात काँग्रेसची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:27 IST

Madhya Pradesh Politics: विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडत आहेत.

Madhya Pradesh News: आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी पक्षाकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. एकीकडे राज्यातील भाजप सरकार एका मागून एक योजनांचा धडाका लावत आहे, तर दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसकडूनही मोठ-मोठी आश्वासने दिली जात आहेत. यातच काँग्रसने एक मोठी घोषणा केली आहे. 

काँग्रेसने जाहीर सभेत घोषणा केलीजनतेला आकर्षित करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हाती सत्ता दिल्यास घरगुती गॅस सिलिंडर 500 रुपयांना देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. रविवारी नरसिंगपूर जिल्ह्यात ही जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत कमलनाथ यांनी भाजप सरकारवरही जोरदार निशाणा साधला. शिवराज सरकारच्या धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली.

भाजप आणि काँग्रेसमध्ये आश्वासनांची स्पर्धाविशेष म्हणजे शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्यासाठी लाडली बहना योजना सुरू केली आहे. अशा स्थितीत काँग्रेस मागे कशी राहील? आता कमलनाथ यांनी आश्वासन दिले की, राज्यात काँग्रेसचे सरकार येताच महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातील.

यामुळे महिला मतदार महत्वाच्यादरम्यान, मध्य प्रदेशमध्ये 2,60,23,733 महिला मतदार नोंदणीकृत आहेत. राज्यातील एकूण 230 विधानसभा जागांपैकी 18 मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये आदिवासीबहुल बालाघाट, मांडला, दिंडोरी, अलीराजपूर आणि झाबुआ जिल्ह्यांचा समावेश आहे. नवीन महिला मतदारांच्या संख्येत 2.79 टक्के वाढ झाली आहे, तर पुरुष मतदारांची संख्या 2.30 टक्के आहे. अंदाजानुसार, 13.39 लाख नवीन मतदारांपैकी 7.07 लाख महिला आहेत.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाElectionनिवडणूक