शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

'जो करेगा वो भरेगा'! भावावर FIR झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:50 IST

बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत.

सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची सर्वत्र जबरदस्त चर्चा सुरू आहे. ते कधी हिन्दू राष्ट्र करण्यासंदर्भातील वक्तव्य, तर कधी लोकांच्या मनातील गोष्टी ओळखण्याच्या टेक्निकमुळे चर्चेत असतात. ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी याचे कारण काही चमत्कार नाही, तर त्याच्या भावाविरोधात नोंदवली गेलेली FIR आहे.

बागेश्वर धामचे आचार्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छोट्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बागेश्वर धाम सरकारचे भाऊ हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट, अशा स्थितीत काही लोकांसोबत दादागिरी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात धीरेंद्र शास्त्री यांची प्रतिक्रियाही आली आहे. 'आपण असत्यासोबत नाही. जो करेल तो भरेल. या प्रकरणाचा संबंध आपल्याशी जोडू नये,' असे धिरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे.

नेमके काय म्हणाले बागेश्वर शास्त्री? -यासंपूर्ण प्रकरणावर बोलताना बागेश्वर धामचे पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, आपण असत्यासोबत नाही. जो करेल तो भरेल. ते म्हणाले, यासंदर्भात आपल्या समजले. याची कायदेशीर निःपक्षपातीपणे सखोल चौकशी व्हावी. आपण कदापी चुकीच्या गोष्टींसोबत नाही. प्रत्येक विषय आपल्यासोबत जोडून नये. आपण सनातन, हिंदुत्व आणि श्री बागेश्वर बालाजींच्या सेवेत अखंडपणे कार्यरत आहोत. हा प्रकार आमच्यासोबत जोडला जाऊ नये.

व्हायरल व्हिडिओमधून समोर आला प्रकार -या व्हिडिओमध्ये आरोपी शालिग्राम तोंडात सिगारेट आणि हातात पिस्तुल घेऊन लोकांना धमकावताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. याच वेळी, तो एका व्यक्तीला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहे. याशिवाय, राई (बुंदेलखंडचे लोकनृत्य) चालणार नाही, असे म्हणतानाही दिसत आहे. या गडा गावात केवळ बागेश्वर धामचे गाणेच वाजणार. मात्र तेथील लोकांनी बागेश्वर धामचे गाणे वाजविण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. 

या संपूर्ण प्रकारावर बोलताना पोलीस अधीक्षक सचिन वर्मा म्हणाले, धार्मिक गाणी वाजवण्यावरून वाद झाला आणि पिस्तूल दाखविण्यासारखा प्रकर समोर आलेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यासंदर्भात तपास सुरू आहे. तपासानंतर, संपूर्ण प्रकार स्पष्ट होईल.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश