शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

CoronaVirus : धक्कादायक! कोरोना संक्रमित युवक लग्नात झाला सामील, अख्खं गाव करावं लागलं सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:44 IST

यासंदर्भात माहिती मिळताच प्रशासन हादरले आणि जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी गाव सील करत रेड झोन म्हणून घोषित केले आहे. (coronaVirus)

निवाडी - मध्येप्रदेशातील निवाडी (niwari) जिल्ह्यात असलेल्या लुहरगुवा गावातील अरुण मिश्रा या युवकाचा कोरोना रिपोर्ट 27 एप्रिलरोजी पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तरीही तो होम आयसोलेशनमध्ये गेला नाही. उलट तो 29 एप्रिलरोजी गावात झालेल्या एक लग्न समारंभात सहभागी झाला. या लग्न समारंभात त्याने लोकांना जेवणही वाढले. एवढेच नाही, तर दुसऱ्या दिवशी तो वरातीत उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील भुचेरा गावालाही गेला. तेथे तो अनेकांच्या संपर्कात आला आणि नवरदेव-नवरीसोबत फोटोही काढले. यानंतर गावातील अेक लोकांची तब्बेत बिघडली आहे. (Madhya pradesh corona positive person attended wedding around 40 people infected in luharguwan village in niwari)

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!

गाव रेड झेन म्हणून घोषित, पोलीसही तैनात -मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावल्याने जवळपास 60 लोकांनी कोरोना टेस्ट केली. यांपैकी जवळपास 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच प्रशासन हादरले आणि जिल्हाधिकारी आशीष भार्गव यांनी गाव सील करत रेड झोन म्हणून घोषित केले आहे. एवढेच नाही, तर या गावाला जोडले गेलेले सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. याशिवाय लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनाही गावात तैनात करण्यात आले आहे. या घटनेनंतर जवळपासच्या गावातही भीतीचे वातावरण आहे.

पॉझिटिव्ह रिपोर्ट येऊनही फिडबॅक घेतला नाही -कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अशी घटना समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. यात संबंधित तरुणाची तर चूक आहेच. पण प्रशासनाचीही चूक समोर आली आहे. 

CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तरुणामुळे लोकांत कोरोना पसरला त्याने 24 एप्रिललाच सॅम्पल दिले होते. 27 तारखेला त्याचा रिपोर्ट आला होता. मात्र, तरीही प्रशासनाने ना संबंधित तुरणाची चौकशी केली ना त्याला काही औषधे दिली. या प्रकरणी निवाडी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरcollectorजिल्हाधिकारी