शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अपघात टळला; सीएम मोहन यादव यांच्या हेलिकॉप्टरचा हवेत तोल गेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:17 IST

पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला अपघात; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Madhya Pradesh CM: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव शनिवारी खंडवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे हेलिकॉप्टर हवेत असंतुलित झाल्याची घटना घडली. पंधाना येथे राज्यस्तरीय 'लाडली बहना योजना' कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री भोपाळकडे रवाना होत असताना हेलिकॉप्टर हवेतच काही सेकंदांसाठी असंतुलित झाल्याचे दृश्य दिसून आले. या घटनेमुळे उपस्थितांची काही काळ श्वास रोखला गेला.

हेलिकॉप्टर मागे सरकल्याने खळबळ

उड्डाणानंतर हेलिकॉप्टर पुढे जाण्याऐवजी काही क्षण मागील दिशेने सरकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हेलीपॅड परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धुळीमुळे संतुलन बिघडले...

हेलिकॉप्टर उड्डाण घेताच हेलीपॅड परिसरात धुळीचे वादळ उडाल्याचे दिसून आले. यावरून PWD विभागाकडून आवश्यक पाणी मारणे व रोलिंग न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या वेळी तीव्र ऊन असल्याने धूळ नियंत्रणासाठी आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे. या धुळीमुळे काही क्षण हेलिकॉप्टर असंतुलित झाले, ज्याला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणूनही पाहिले जात आहे.

पायलटच्या कौशल्यामुळे मोठा अनर्थ टळला

अशा परिस्थितीत पायलटने प्रसंगावधान आणि कौशल्य दाखवत तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. काही क्षणांतच हेलिकॉप्टरने धुळीतून सुरक्षित उंची गाठली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा खंडव्यातून भोपाळपर्यंतचा प्रवास पूर्णतः सुरक्षित पार पडला.

प्रशासन व उपस्थितांना दिलासा

या घटनेनंतर प्रशासनातील अधिकारी आणि उपस्थित लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्वास घेतला. घटनेची चौकशी होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : MP CM's Helicopter Wobbles Mid-Air; Major Accident Averted Due to Pilot Skill

Web Summary : Madhya Pradesh CM Mohan Yadav's helicopter briefly became unstable during takeoff in Khandwa due to dust. The pilot's skill averted a major accident. An inquiry is expected regarding the security lapse and dust control measures.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्री