मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
आणखी दोन डॉक्टरांना अटक

मध्य प्रदेश व्यापमं घोटाळा
आ खी दोन डॉक्टरांना अटकजबलपूर: मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळाप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोन डॉक्टरांना उत्तर प्रदेशात अटक केली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी सोनाली आणि संध्या यांनी दिलेल्या बयाणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.हे दोन्ही डॉक्टर मुन्नाभाईंच्या टोळीत सामील होते आणि पीएमटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवून देणाऱ्यांची व्यवस्था करीत होते. जाबजबाबानंतर गुन्हे शाखेने त्यांची एक दिवसाची कोठडी मिळविली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयात फसवणुकीद्वारे प्रवेश मिळविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विद्यार्थिनींचा जाबजबाब नोंदविल्यानंतर सुधीर कश्यप आणि आशुतोष या दोन डॉक्टरांची नावे समोर आली. पोलिसांनी धागेदोर जुळवत डॉ. सुधीर सिंगला चित्रकूटजवळ पकडले. चौकशीत त्याने लखनौ वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले असल्याचे कळले. तेथेच त्याचा दुसरा साथीदार विकास सिंग पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने भोपाळ वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले होते. त्यांनी ज्या मुन्नाभाईंना परीक्षार्थी म्हणून परीक्षेत बसविले होते आणि यासाठी २० ते २५ हजार रुपये दिले होते.(प्रतिनिधी)