मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 9 ते 10 जण ठार

By Admin | Updated: October 2, 2016 19:55 IST2016-10-02T19:55:37+5:302016-10-02T19:55:37+5:30

मध्यप्रदेशमधील विदीशा जिल्ह्यात बस नदीत कोसळली असून यामध्ये 9 ते 10 जण ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात

In Madhya Pradesh, the bus fell into river, 9 to 10 people died | मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 9 ते 10 जण ठार

मध्यप्रदेशमध्ये बस नदीत कोसळली, 9 ते 10 जण ठार

>ऑनलाइन लोकमत
 
विदीशा, दि. 2- मध्यप्रदेशमधील विदीशा जिल्ह्यात बस नदीत कोसळली असून यामध्ये 9 ते 10 जण ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदीशा जिल्ह्यातील सपन नदीवरील पुलावरुन बस जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 
पुलाचा कठडा तोडून बस थेट नदीत जाऊन कोसळली. यावेळी बसमध्ये जवळपास 25 प्रवासी होते. त्यामुळे मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 4 जण जखमी असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.  घटनास्थळी बचावमोहीम अजूनही सुरु आहे.
 
 

Web Title: In Madhya Pradesh, the bus fell into river, 9 to 10 people died