मध्यप्रदेशात बस नदीत कोसळून, १५ ठार
By Admin | Updated: December 15, 2015 13:21 IST2015-12-15T13:21:06+5:302015-12-15T13:21:06+5:30
मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्हयामध्ये मंगळवारी सकाळी खासगी प्रवासी बस नदीत कोसळली.

मध्यप्रदेशात बस नदीत कोसळून, १५ ठार
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. १५ - मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्हयामध्ये मंगळवारी सकाळी खासगी प्रवासी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी ठार झाले तर, २५ प्रवासी जखमी झाले. इंदूरहून बस परासियाच्या दिशेने येत असताना, लोंगाबंजारी गावाजवळ अपघात झाला.
बस नदीवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलावरुन जात असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. सोहागपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युध्दस्तरावर सुरु आहे.