शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

The Burning Train: मध्य प्रदेशात बर्निंग ट्रेन, धावत्या गाडीला आग लागून दोन डबे खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:30 IST

Burning Train In Madhya Pradesh: मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूरजवळ आज बर्निंग ट्रेनचे धक्कादायक चित्र दिसले. वैष्णोदेवी येथून येत असलेल्या दुर्ग-उधमपूर ट्रेनला मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूर येथे आग लागली. या आगीमुळे ट्रेनमधील एसी बोगी ए-१ आणि ए-२ हे पूर्णपणे जळून खाक झाले.

भोपाळ - मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूरजवळ आज बर्निंग ट्रेनचे धक्कादायक चित्र दिसले. वैष्णोदेवी येथून येत असलेल्या दुर्ग-उधमपूर ट्रेनला मध्य प्रदेशमधील मुरैना-धौलपूर येथे आग लागली. या आगीमुळे ट्रेनमधील एसी बोगी ए-१ आणि ए-२ हे पूर्णपणे जळून खाक झाले. दरम्यान, आग लागलेल्या दोन्ही डब्यांना ड्रेनपासून वेगळे करण्यात आले आहे. आग लागलेल्या डब्यांमधून अन्य डब्यांमध्ये पसरल्याने गोंधळाचे वातावरण पसरले. दरम्यान, फायर ब्रिगेडचे आठ बंब आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर काही वेळाने ट्रेनला ग्वाल्हेरकडे रवाना करण्यात येईल. सध्या ही ट्रेन मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर स्टेशनवर उभी आहे.

या घटनेनंतर एका प्रवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही झोपलेलो होतो. त्याचवेळी काही जळाल्याचा वास आला. अचानक आग, आग असा ओरडा ऐकू आला. आम्ही पाहिले असता डब्यामध्ये खूप धूर भरला होता. आम्ही डब्यातील लोकांना खाली उतरण्यास सांगितले आणि पटापट सामान उतरवून घेतले. दरम्यान, एक मुलगी बेशुद्ध झाली होती. तिला इतर सहकाऱ्यांच्या मदतीने खाली उतरवण्यात आले. 

टॅग्स :fireआगIndian Railwayभारतीय रेल्वेMadhya Pradeshमध्य प्रदेश