शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 22:08 IST

मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वतःच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

 भोपाळ- मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वतःच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी काँग्रेसनं मंगळवारी तिसरी यादी जाहीर केली होती, ज्यात 13 उमेदवारांच्या नावांची घोषणा होती. तर दुस-या यादीत 16 आणि पहिल्या यादीत 155 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. अशाच प्रकारे काँग्रेसनं मध्य प्रदेश निवडणुकीसाठी एकूण 231 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.काँग्रेसनं जाहीर केलेल्या चौथ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मेहुणा संजय सिंह याला वारसिवनी मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तर इतर दोन उमेदवारांचे मतदारसंघ बदलण्यात आले आहेत. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नावांमध्ये एकूण 29 नावांचा समावेश आहे. काँग्रेसकडून अजून 22 नावांची घोषणा करण्याचं बाकी आहे. काँग्रेस उद्या त्या 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे संजय सिंह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ यांच्या बाजूने लॉबिंग सुरू केले. यावेळी संजय सिंह म्हणाले, मध्य प्रदेशात आता शिवराज नाही तर कमलनाथ यांची गरज आहे. शिवराज यांचे राज्य भरपूर झाले. त्यांनी 13 वर्षे सत्ता सांभाळली. आता कमलनाथ यांना ती सत्ता मिळाली पाहिजे.मध्य प्रदेशात गुंतवणूकदारांच्या अनेक बैठकी झाल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. राज्यात अनेक तरुण बेरोजगार आहेत.  कमलनाथ यांनी छिंदवाडा भागात केलेली विकास कामे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनता कमलनाथ यांची वाट पाहत आहेत, असेही संजय सिंह यांनी सांगितले. याचबरोबर, ज्याप्रकारे भाजपामध्ये निष्ठेने सेवा केली. त्याच भावनेने संजय सिंह काँग्रेसमध्ये करतील, असे कमलनाथ यांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसElectionनिवडणूक