शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 19:59 IST

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे भाजपा अडचणीत आहे, अशा परिस्थितीत भाजपाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी छक्कल लढवली आहे. आता मध्य प्रदेशमध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाचे नेते जादुगारांची मदत घेणार आहेत. हे जादुगार ग्रामीण भागात जादूचे प्रयोग दाखवतील. तसेच सरकारने गेल्या 15 वर्षांत केलेल्या कामांची माहिती देतील. जादूच्या प्रयोगांमधून प्रभावी प्रचार करण्यासाठी भाजपाने पूर्ण रणनीती आखली आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने राबवलेल्या संबल योजना आणि लाडली लक्ष्मी योजना यासारख्या लोकप्रिय योजनांच्या व्यापक प्रचाराच्या दृष्टीने खेळ तयार करण्यास सांगितले आहे. त्याबरोबरच पक्षाकडून लोकनृत्य, नुक्कड, नाटक यांचीही मदत मतदारांनी आकर्षिक करण्यासाठी घेण्यात येणार आहे.    भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी सांगितले की, "उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाच्या प्रचार सुरुवात होईल. त्यानंतर जादुगार, नाटके, छोट्या छोट्या कलांच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या कामांचा प्रचार करणार आहोत. त्यासाठी सहा जादुगारांची मदत घेणार आहोत. जादुगारांचा प्रत्येक कार्यक्रम अर्ध्या तासाचा असेल. तसेच या माध्यमातून 151 मतदारसंघामध्ये प्रचार केला जाईल."  दरम्यान, भाजपाच्या या जादूच्या प्रयोगांमुळे काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले की, राज्यातील भाजपा सरकार 15 वर्षांपासून भ्रम पसरवून लोकांना फसवत आहे. पण आता कुठलाही भ्रम चालणार नाही. मामाजी आम्हाला मामू बनवण्याचे बंद करा, असे जनता सांगत आहे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी राज्यातील भ्रष्ट सरकारची अखेर होणार आहे."

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018BJPभाजपाshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहान