शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 11:51 IST

विवाहित महिला ऑनलाईन एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिचं या तरुणावर इतकं प्रेम होतं की, ती आपली ५ मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह गुजरातला गेली

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये प्रेमप्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. विवाहित महिला ऑनलाईन एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तिचं या तरुणावर इतकं प्रेम होतं की, ती आपली ५ मुलं आणि नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह गुजरातला गेली आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. आता जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा महिलेने तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं असून ती तिच्या नवऱ्याला कंटाळली असल्याचं सांगितलं आहे. 

३२ वर्षीय महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले.  याच दरम्यान महिलेची इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री झाली आणि नंतर ती प्रेमात पडली. महिलेला पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर भेटलेल्या तरुणाच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेने आपल्या मुलांना आणि नवऱ्याला सोडून गुजरात गाठलं आणि बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावातील रहिवासी असलेल्या नेमी देवीचा विवाह नारणा राम भील यांच्याशी झाला होता. नेमी देवी कधीच शाळेत गेली नाही. ती डान्सचे रील्स बनवायची आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची. तिचे ४० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची इन्स्टाग्रामवर भीमाराम यांच्याशी ओळख झाली. ते एकमेकांना आवडू लागले. दोघांमध्ये दीड वर्षांपासून अफेअर सुरू होतं. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 

नेमी देवी कुठल्यातरी बहाण्याने सासरचं घर सोडून बॉयफ्रेंडसोबत गेली. ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने जैसलमेरच्या सदर पोलीस ठाण्यात बायको हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेमी देवीचा शोध सुरू केला. सोमवारी नेमी देवी आपल्या बॉयफ्रेंडसह बारमेर जिल्हा मुख्यालयातील पोलीस ठाण्यात हजर झाली. 

नेमी देवी म्हणाली की, तिला ५ मुलंही आहेत, पण तिचा नवरा तिला मारहाण करायचा. तिच्याकडे संशय घ्यायचा. त्यामुळे ती कंटाळली होती. याच दरम्यान तिची इन्स्टाग्रामवर भीमाराम यांच्याशी ओळख झाली. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि आता लग्न करून आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहायचं आहे.

इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताना दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिल्याचं भीमारामने सांगितले. प्रेमात पडलो. आम्ही दोघे गुजरातमधील पालनपूरमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो असंही म्हणाला. दोघांच्याही कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, त्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान