शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:47 IST

Madhya Pradesh News: भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तर आता बागरी यांचा भाऊ अनिल बागरी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. तर आता बागरी यांचा भाऊ अनिल बागरी यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रतिमा बागरी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्या पत्रकारांवर भडकल्या.

रामपूल बघेलान पोलीस ठाण्यातील पोलिसांनी बेकायदेशीर गांजा तस्करी प्रकरणी एक मोठी कारवाी केली होती. गोपनीय माहितीच्या आधारावर कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गांजा जप्त केला होता. तसेच दोन तस्करांना अटक केली होती.

जप्त करण्यात आलेल्या गांजाचे प्रमाण सुमारे ४६ किलोग्रॅम असल्याचे सांगण्यात येत आहे. या अटकेच्या कारवाईमधील धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री असलेल्या प्रतिमा बागरी यांचा सख्खा भाऊ अनिल बागरी हा आहे. या प्रकरणी पत्रकारांनी जेव्हा मंत्री प्रतिमा बागरी यांना प्रश्न विचारला तेव्हा त्या संतापल्या. तसेच  तुम्ही लोक जबरदस्तीने हा प्रश्न का विचारताय?, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. तस्करीच्या आरोपाखाली भावाला झालेल्या अटकेबाबत प्रश्न विचारल्याने मंत्रिमहोदयांना आलेला राग पाहा. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक कशा प्रकारची काळी कामे करत आहेत. हे या अटकेमधून दिसून आले आहे, असा टोला मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावरून लगावला आहे.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस