शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

M-777 Howitzer : आता पापणी लवताच होईल शत्रूचा खात्मा; फक्त मृत्यू बरसतात या नव्या भारतीय तोफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 01:04 IST

आता M-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा (M-777 Ultra light Howitzer) भारतीय लष्करात समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचा खात्मा करण्याची या तोफांची क्षमता आहे.

भारत आणि शेजारील देशांमध्ये अनेक वेळा कोल्डवार सारखी स्थिती दिसून येते. चकमकीही होतात. मात्र आता भारतीय सीमेकडे तिरप्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तान आणि चीनला धडकी भरणार आहे. कारण आता M-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा (M-777 Ultra light Howitzer) भारतीय लष्करात समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचा खात्मा करण्याची या तोफांची क्षमता आहे.

या तोफा भारतीय लष्करात सामील झाल्याने, केवळ पाकिस्तानलाच नाही तर चीनलाही या तोफांचा सामना करणे अवघड असेल. कारण या तोफांमध्ये अशा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे या तोफांमधून निघणारे आगीचे गोळे शत्रूला अचूकपणे लक्ष्य करू शकतात. एवढेच नाही, तर बदलत्या लक्ष्यावरही मारा करू शकतात. या अत्याधुनिक तोफांची खासियत म्हणजे, यातून निघणाऱ्या गोळ्यांचा मार्ग रस्त्यातूनच बदलताही येऊ शकतो.भारतीय आर्मीची ताकद वाढणार - भारतीय लष्कराने या तोफा देशाच्या उत्तर आणि इशान्य सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तोफा सैन्य दलात सामील झाल्याने भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवर बारीक खोड्या काढत असतो आणि भारतीय लष्करही त्याला चोख प्रत्युत्तर देत असते. तर दुसरीकडे चीनचा अरुणाचल प्रदेशातील गावांवर डोळा आहे. अशा परिस्थितीत या तोफांचा भारतीय लष्करात सामील झाल्याने देशाची संरक्षण शक्ती वाढेल. या तोफांची रेंज 24 ते 40 किलोमीटरपर्यंत आहे. महत्वाचे म्हणज या तोफा कसल्याही प्रकारच्या हवामानात वापल्या जाऊ शकतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिकPakistanपाकिस्तानchinaचीनBorderसीमारेषा