सचिन केरळमध्ये घेणार लक्झरी व्हिला

By Admin | Updated: September 4, 2015 09:39 IST2015-09-04T09:39:36+5:302015-09-04T09:39:45+5:30

मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर आता केरळमध्ये अलिशान लक्झरी व्हिला विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Luxury Villa to be taken by Sachin Tendulkar in Kerala | सचिन केरळमध्ये घेणार लक्झरी व्हिला

सचिन केरळमध्ये घेणार लक्झरी व्हिला

ऑनलाइन लोकमत

कोच्ची, दि. ४ - मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर आता केरळमध्ये अलिशान लक्झरी व्हिला विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोच्ची येथील पानागड परिसरात नदी किनारी हा अलिशान व्हिला असल्याचे समजते. 

सचिन तेंडुलकर केरला ब्लास्टर या फुटबॉल संघाचा सहमालकही असून आता लवकरच सचिन केरळमध्ये घरदेखील घेणार आहे. प्राईम मॅरेडियन या रिअल इस्टेट कंपनीतील एका वरिष्ठ अधिका-यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पानागड येथे बॅकवॉटरच्या किनारी निसर्गरम्य वातावरणात असलेला एक व्हिला सचिनने पसंत केला आहे असे त्या अधिका-याने सांगितले. मात्र हा व्हिला सचिनने विकत घेतला की नाही याविषयी त्याने थेट उत्तर दिलेले नाही. या व्हिलामध्ये दोन स्विमींग पुल असून सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच, २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षक, व्हिडीओ कॉलिंगची सुविधा अशा अनेक सुविधा या व्हिलामध्ये उपलब्ध आहेत. 

Web Title: Luxury Villa to be taken by Sachin Tendulkar in Kerala