लालूंचं फेसबुक अकाऊंट हॅक

By Admin | Updated: March 16, 2016 11:55 IST2016-03-16T11:47:19+5:302016-03-16T11:55:54+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. लालूंच अकाऊंट हॅक करुन त्याच्यावरुन आक्षेपार्ह पोस्टदेखील टाकण्यात आल्या

Luv Facebook Account Hack | लालूंचं फेसबुक अकाऊंट हॅक

लालूंचं फेसबुक अकाऊंट हॅक

>ऑनलाइन लोकमत -
पाटणा, दि. १६ - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. लालूंचं अकाऊंट हॅक करुन त्याच्यावरुन आक्षेपार्ह पोस्टदेखील टाकण्यात आल्या. 12 मार्चला एका कार्यकर्त्यांने हा मुद्दा उचलल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली.  
 
8 मार्च ते 12 मार्च असे एकूण चार दिवस अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या चार दिवसांत लालूंच्या फेसबुक अकाऊंटचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह फोटो, कमेंट्स पोस्ट करण्यात आल्या. लालूंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. सायबर सिक्युरिटीच्या मदतीने लालूंच फेसबुक अकाऊंट बंद करण्यात आलं असून नवीन अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल असं सांगितलं आहे.
 

Web Title: Luv Facebook Account Hack