प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:59+5:302015-02-18T23:53:59+5:30
प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान

प्रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामान
प रवाशांना स्वत:च उचलावे लागणार सामानउद्यापासून अधिवेशन : १५० कुली जाणार दिल्लीलानागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना पुढील चार दिवस आपले सामान स्वत:लाच उचलण्याची पाळी येणार आहे. दिल्लीमध्ये कुलींचे अधिवेशन होत असून त्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १५० कुली गुरुवारी दिल्लीला रवाना होत आहेत. सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल माजिद यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारीपासून दिल्लीच्या जंतरमंतरमध्ये केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वात कुलींचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात आपल्या मागण्यांसाठी नागपूर विभागातील १५० कुली सहभागी होत आहेत. त्यासाठी १९ फेब्रुवारीला गोंडवाना एक्स्प्रेसने कुली दिल्लीला रवाना होत आहेत. कुलींना ग्रुप डी मध्ये नोकरी द्यावी, त्यांना वैद्यकीय सुविधा द्याव्यात, परिवाराला रेल्वे प्रवासाची मोफत पास द्यावी, नियमित कालावधीत बिल्ला हस्तांतरीत करावा, काम करताना अपघात झाल्यास रेल्वेतर्फे मदत मिळावी आणि रेल्वेस्थानकावरील बॅटरी कार बंद करावी आदी मागण्या अधिवेशनात करण्यात येणार आहेत. दिल्लीवरून २२ फेब्रुवारीला सर्व कुली बांधव नागपुरात पोहोचणार आहेत. या कालावधीत प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत कुलींनी खेद व्यक्त करून प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.............