शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात; पळून जाऊन बांधली लग्नगाठ, भावानेच केलं कन्यादान अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 14:14 IST

Viral Video News : दोन बहिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाचे वेगवेगळे भन्नाट किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. कोण कधी कोणाच्या कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. दोन बहिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या आहेत. घरातून पळून जाऊन त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे भावानेच यांचं कन्यादान केलं आहे. मात्र या मुलींच्या आई-वडिलांना लग्नाचा पत्ताच नाही. मुलींच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. हाच व्हिडीओ पाहून मुलींच्या कुटुंबीयांना लग्न झाल्याची माहिती मिळाली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या जगराओमधील सवदी कलांमध्ये दोन चुलत बहिणींनी एकमेकींशी लग्न केलं आहे. सध्या या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून एकच खळबळ उडाली आहे. मुलींनीच आपल्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. तो मुलींच्या नातेवाईकांपर्यंत देखील पोहोचला आणि त्यांना मोठा धक्काच बसला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये या दोघी एकमेकांना हार घालताना दिसत आहे. इतकंच नाही तर एका मुलीने दुसरीला कुंकूदेखील लावलं आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर गावकऱ्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला आहे. 

मुलींच्या कुटुंबीयांना त्यांच्या या प्रेमाची अजिबात कल्पना नव्हती त्यामुळे लग्नाचा व्हिडीओ पाहिल्यावर ते हैराण झाले. मात्र त्यांच्या भावाने त्यांचं कन्यादान केलं असून तो लग्नाला उपस्थित होता. कुटुंबीयांनी आता मुलींचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात गावातील सरपंचाने देखील अशा कृत्यामुळे आजूबाजूचं वातावरणही बिघडतं. त्यामुळे या मुलींना गावात राहू देणार नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. सध्या या लग्नाचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काय सांगता? 8 पायांच्या पिल्लाला शेळीने दिला जन्म; पाहण्यासाठी लोकांची झुंबड अन् 5 मिनिटांत झालं असं काही...

देशात अनेक अजब-गजब घटना या घडत असतात. अशीच एक घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. एका शेळीने तब्बल 8 पाय (8 Legs and 2 hips) असणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून काहींनी हा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. पिल्लाला पाहण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. गावकऱ्यांसोबतच इतरही लोकांनी या गावात धाव घेत मोठी गर्दी केल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम बंगालच्या बनगावातील कमलेघा परिसरात ही अजब घटना घडली आहे. सरस्वती मोंडल या महिलेकडे शेळ्य़ा, गाय यासह अनेक पाळीव प्राणी आहेत. त्याच्याकडील शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला. त्यातील एक पिल्लू सामान्य होतं. तर दुसऱ्या पिल्लाला आठ पाय होते.

टॅग्स :marriageलग्नPunjabपंजाबSocial Viralसोशल व्हायरल