शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Lucknow: आता लखनौचं नाव बदलणार?, योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्वीटनं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 08:54 IST

Lucknow Name Change: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या एका ट्वीटनं लखनौचं नाव बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Lucknow Name Change Prediction after CM Yogi Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांची भेट घेतली. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी योगी सरकारच्या मंत्र्यांना त्यांच्या क्षेत्रात जास्तीत जास्त वेळ देण्याच्या सूचना दिल्या. असं असलं तरी सर्वाधिक चर्चा ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ट्वीटची होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी त्यांनी एक ट्वीट केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लखनौला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत (Yogi Adityanath welcomes PM Narendra Modi) केलं. तसंच त्यांनी एक फोटोही शेअर केला. यामध्ये त्यांनी शेषावतार भगवान श्री लक्ष्मण यांच्या पावन नगरी लखनऊमध्ये तुमचं हार्दिक स्वागत व अभिनंदन..,’ असं म्हटलं. यात त्यांनी नाव बदलण्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही. परंतु भगवान श्री लक्ष्मण यांची पावन नगरी असा उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर मात्र याची चर्चा रंगली होती. काही लोकांनी लखनौचं नाव बदलून लक्ष्मणपुरी ठेवण्याचाही सल्ला दिला.  यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी काही ठिकाणांची नावं बदलली होती. त्यांनी अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं होतं. त्यानंतर फैजाबादचं नाव बदलून अयोध्या करण्यात आलं. याशिवाय मुगलसरायचं स्टेशनचं नाव बदलून पंडित दीनदयाल रेल्वे स्टेशन करण्यात आलं आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी