शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

25 हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद चाचांना पद्मश्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 15:34 IST

अयोध्या येथील सन्मान सोहळ्यात बोलताना मोहम्मद चाचांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अयोध्या - पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणाऱ्या मुहम्मद शरीफ यांचा अयोध्या जिल्ह्यात सन्मान करण्यात आला. प्रभारी मंत्री निलकंठ तिवारी आणि जिल्हाधिकारी अनुजकुमार यांनी अंगावर तिरंगा चढवत शरीफ यांचा सत्कार केला. यावेळी मोहम्मद चाचांच्या डोळ्यात अश्रू तरळले, वयाच्या 80 व्या वर्षीही आनंद साजरा करताना ते भावनाविभोर झाल्याचं पाहायला मिळालं. 

अयोध्या येथील सन्मान सोहळ्यात बोलताना मोहम्मद चाचांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सुल्तानपूर येथे 27 वर्षांपूर्वी माझ्या मुलाची हत्या करण्यात आली होती. याबाबत तब्बल 1 महिन्यानंतर मला माहिती मिळाली. त्यानंतर, मी हे काम हाती घेतलं. आजपर्यंत 3 हजार हिंदू आणि 2500 मुस्लीम व्यक्तींच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम माझ्या हातून घडलं, असं मोहम्मद चाचांनी सांगितलं. सन 1993 मध्ये मोहम्मद चाचा यांचा मुलगा मोहम्मद रईस हा औषधे खरेदी करण्यासाठी गेला होता. मात्र, एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. याबाबत तब्बल 1 महिन्यानंतर मोहम्मद चाचांना माहिती मिळाली. गेल्या महिनाभर ते मुलाचा तपास करत होते. मात्र, पोलिसांनी रईसच्या कपड्यावरील टेलरचा शोध घेतला. तर, कपड्यावरुन मोहम्मद चाचा यांना रईसला ओळखले. मात्र, तोपर्यंत एक बेवारस पार्थिव म्हणून रईसवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मोहम्मद चाचांना या घटनेनं हादरा बसला. तेव्हापासून बेवारस मृतदेहांवर त्यांच्या धर्मानुसार रितीरीवाजाने अंत्यसंस्कार करण्याचं वचन त्यांनी घेतलं. त्यानुसार, आजपर्यंत 25 हजार बेवारस पार्थिव शरिरावर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. चाचांच्या या महान कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमministerमंत्रीPadmashri Warriorपद्मश्री वॉरिअर