एलपीजी सिलिंडर दरवाढीचा भडका; महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला जोरदार झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 11:23 AM2021-08-01T11:23:52+5:302021-08-01T11:30:08+5:30

पेट्रोल, डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ

lpg gas cylinder price hike by 73 rupees on commercial cylinder | एलपीजी सिलिंडर दरवाढीचा भडका; महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला जोरदार झटका

एलपीजी सिलिंडर दरवाढीचा भडका; महिन्याच्या पहिल्याच दिवशी खिशाला जोरदार झटका

Next

नवी दिल्ली: पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असताना आता एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात ७३.५ रुपयांनी वाढ केली आहे. या महिन्यात केवळ व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरांमध्येच वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

घरगुती वापराच्या १४.२ किलोग्रामच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या सिलिंडरच्या किमतीत गेल्या महिन्यात २५.५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सिलिंडरचा दर मुंबईत ८३४.५० रुपयांवर पोहोचला. दिल्लीतही सिलिंडरचा दर इतकाच आहे. कोलकात्यात सिलिंडरचा दर ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५०.५० रुपये आहे.

१९ किलो व्यवसायिक सिलिंडरचे नवे दर
मुंबईत ७२.५० रुपयांची वाढ झाल्यानं सिलिंडरचा दर १५७९.५० रुपयांवर
दिल्लीत ७३ रुपयांच्या वाढीनं सिलिंडरचा दर १६२३ रुपयांवर
कोलकात्यात ७२.५० रुपयांची वाढ; नवा दर १६२९ रुपये
चेन्नईत ७३.५० रुपयांची वाढ; नवा दर १७६१ रुपये

Web Title: lpg gas cylinder price hike by 73 rupees on commercial cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.