शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

LPG Cylinder Price: आता तर सबसिडी पण गेली; घरगुती सिलिंडरचा दर गेल्या ८ वर्षात अडीच पटीनं वाढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:10 IST

रेकॉर्ड ब्रेक महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.

नवी दिल्ली-

रेकॉर्ड ब्रेक महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यातच कालच पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंगडरच्या किमतीत तब्बल ५० रुपयांची वाढ करुन जोरदार झटका दिला. घरगुती सिलिंडरच्या दरात गेल्या काही वर्षांत सातत्यानं वाढ नोंदविण्यात आली आहे. आजवरचे आकडे पाहिले तर आठ वर्षात घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास अडीच पटीनं वाढ झाली आहे. 

सरकारी तेल वितरण कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) आकडेवारीनुसार मार्च २०१४ मध्ये अनुदानित (सबसिडी) सिलिंडरचा दर ४१० रुपये इतका होता. सध्याच्या वाढीव दरानुसार आता १४.२ किलो घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत सध्या LPG सिलिंडरच्या दर १०५३ रुपये इतका आहे.  १४.२ किलो सिलिंडरसोबतच ५ किलो सिलिंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. ५ किलो सिलिंडरच्या दरात १८ रुपयांनी वाढ झाली आहे. 

कोणत्या शहरात किती दर?दिल्ली- १०५३मुंबई- १०५३कोलकाता- १०७९चेन्नई- १०६९लखनौ- १०९१जयपूर- १०५७पाटणा- ११४३इंदौर- १०८१अहमदाबाद- १०६०पुणे- १०५६गोरखपूर- १०६२भोपाळ- १०५९आग्रा- १०६६

वर्षभरात गॅसच्या किंमती एवढ्या वाढल्यागेल्या वर्षभरात दिल्लीत घरगुती सिलिंडरच्या दरात जवळपास २१९ रुपयांनी वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी दिल्लीत घरगुरीत सिलिंडरचा दर ८३४.५० रुपये इतका होता. जो आज १०५३ रुपये इतका झाला आहे. १४.२ किलो घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात याआधी १९ मे रोजी वाढ झाली होती. त्यावेळी चार रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याआधी २२ मार्च रोजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर