महिला आणि वयस्कांसाठी खालचे बर्थ आरक्षित
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30
नवी दिल्ली : वयस्क आणि महिलांसाठी शयनयान श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालचे चार बर्थ तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी डब्याच्या मधल्या भागातील सहा जागांचा कोटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वयस्क आणि महिलांचा प्रवास सुखकर करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

महिला आणि वयस्कांसाठी खालचे बर्थ आरक्षित
न ी दिल्ली : वयस्क आणि महिलांसाठी शयनयान श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालचे चार बर्थ तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी डब्याच्या मधल्या भागातील सहा जागांचा कोटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वयस्क आणि महिलांचा प्रवास सुखकर करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.सध्या विविध श्रेणींच्या डब्यांमध्ये खालचे दोन बर्थ वयस्क आणि महिलांसाठी आरक्षित असून केवळ शयनयान श्रेणीत ही संख्या दुप्पट म्हणजे चार करण्यात आली आहे. अन्य डब्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच व्यवस्था कायम असेल. ६० वर्षांवरील पुरुष आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी खालचे बर्थ आरक्षिण ठेवण्याची व्यवस्था संगणकीकृत प्रणालीत असेल. तिकीट तपासणी कर्मचारी वयस्क आणि अपंगांना खालचे बर्थ मिळवून देतात. या श्रेणीत आता गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्यासाठी जागा आरक्षित करण्याचा अधिकार या कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.