बेंगळूरू येथे कमी शक्तीचा स्फोट

By Admin | Updated: December 28, 2014 23:01 IST2014-12-28T22:57:00+5:302014-12-28T23:01:43+5:30

संध्याकाळी ८:३० च्या सुमारास येथील चर्च स्ट्रीट येथे झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे.

Low power explosion in Bangalore | बेंगळूरू येथे कमी शक्तीचा स्फोट

बेंगळूरू येथे कमी शक्तीचा स्फोट

>ऑनलाइन लोकमत
बेंगळूरू, दि. २८ - संध्याकाळी ८:३० च्या सुमारास येथील चर्च स्ट्रीट येथे झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला माल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुस-या जखमी व्यक्तीची प्रकृती चिंताजनक नसल्याचे येथील पोलीस उपायुक्त एम. एन रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. कायदे मंत्री सदानंद गौडा यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामन यांनीही घटना स्थळी भेट दिली असून नागरिकांनी घाबरून जाऊनये असे आवाहन त्यांनी केले आहे. 
 

Web Title: Low power explosion in Bangalore