बेंगळुरुत कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट, दोन जखमी
By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:23+5:302014-12-28T23:40:23+5:30
बेंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेंगळुरुत कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट, दोन जखमी
ब ंगळुरु : बेंगळुरु येथील एका उपहारगृहाच्या बाहेर रविवारी रात्री आयईडी बॉम्बचा स्फोट होऊन त्यात दोन जण जखमी झाले. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.बेंगळुरुतील चर्च स्ट्रीट या वर्दळीच्या भागात असलेल्या कोकोनट ग्रोव्ह नावाच्या उपहारगृहाबाहेर रात्री ८.३० वाजता हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. या स्फोटात जखमी झालेल्या महिलेचे नाव भवानी असून ती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या यांना फोन केला आणि सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. (वृत्तसंस्था)