शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 06:04 IST

नीचांक : केंद्र सरकार म्हणते, राज्यांकडे ७५ लाख मात्रांचा साठा

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : देशात प्राणवायूची टंचाई आणि त्याच्या वितरणाच्या गैरव्यवस्थेमुळे हृदय विदीर्ण करणारी दृश्ये असताना, त्यात रविवारी अत्यंत कमी लसीकरणाचा प्रश्न समाविष्ट झाला आहे. दोन एप्रिल रोजी एका दिवसात देशात ४२.७० लाख लस दिली गेली होती, तर त्याचे दुसरे टोक दोन मे रोजी फक्त ३.८० लाख लसदिली जाऊन गाठले गेले. हे धक्कादायक होते. कारण एक मेपासून देशभर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची मोहीम सुरू झाली. एक मेरोजी देशात १८.३० लाख मात्रा आणि ३० एप्रिल रोजी २७.४० लाख मात्रा दिल्या गेल्या होत्या. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता, त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, “राज्यांकडे ७५ लाखांपेक्षा जास्त लसीच्या मात्रा असताना, त्यांनीच खुलासा केला पाहिजे. राज्यांना वेळेत लस उपलब्ध करून देणे हे आमचे आणि त्यांनी लोकांचे लसीकरण करणे हे त्यांचे काम आहे.” खूप कमी लसीकरण झाले, त्याची कारणे लॉकडाऊन, निर्बंध आणि इतर काही प्रश्न असू शकतात. परंतु, दोन मेरोजी फक्त ३.८० लाख लसीकरण झाले, याबद्दल केंद्र सरकार कमालीचे नाराज आहे. लसीकरणाचा वेग मंद असेल तर त्याचा थेट परिणाम रुग्ण आणि मृत्यू वाढण्यात होईल, असे अधिकारी म्हणाला.

महाराष्ट्रात रविवारीफक्त २० हजार डोसn    महाराष्ट्राने रविवारी २० हजार चार इतकी कमी लस दिली. n    दिल्लीत हीच संख्या ३७०० होती. महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यांतच कोरोनाचे रुग्ण कमी होतआहेत. n    सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशने १५ हजार ३००, तर गुजरातने ५३ हजार ६०० मात्रा रविवारी दिल्या.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र