शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचं दुसऱ्यासोबत लग्न होताना पाहून प्रियकर सैरभैर झाला, स्टेजवर आला अन्...; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 11:33 IST

प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर वेडा झाला, संतापला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात हार घातला.

नवी दिल्ली - बिहारमधील नालंदा जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. यात प्रेयसीचं लग्न होताना पाहून प्रियकर वेडा झाला, संतापला आणि त्याने स्टेजवर चढून सर्वांसमोर नवरीच्या गळ्यात हार घातला. तरुणाने वधूला कुंकूही लावण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहून स्टेजवर उपस्थित असलेला नवरदेवही हैराण झाला. समारंभात उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित झाले. वधूच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर वराने लग्नास नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयामुळे नवरीकडील लोक आणखीच नाराज झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरनौत पोलीस स्टेशन हद्दीतील मुबारकपूर गावात ही घटना घडली आहे. मुबारकपूर गावातील रहिवासी असलेल्या मुकेशचे गेल्या एका वर्षापासून गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं. मंगळवारी रात्री मुलीची वरात आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक हार घालण्याच्या कार्यक्रमावेळी प्रियकर मुकेश हातात फुलांचा हार आणि सिंदूर घेऊन स्टेजवर चढला आणि नववधूच्या गळ्यात त्याने हा हार घातला. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली.

नवरदेव या घटनेनंतर लग्न न करताच वरात घेऊन परत गेला. वरात परतल्याने वधूपक्षाचे लोक आणखीच भडकले आणि त्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. सध्या त्याला बिहारशरीफ येथील एका रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रियकर मुकेशने सांगितलं की, त्याचं गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचं ठरवलेलं असा दावा त्याने केला आहे. असं असतानाही मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या प्रेयसीचं बळजबरीने दुसऱ्याशी लग्न लावून दिलं.

मुकेशने दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीने त्याला सांगितलं होतं की, जेव्हा तिचं लग्न होणार असेल तेव्हा त्याने हार घालण्याच्या वेळी येऊन तिला कुंकू लावावं, त्यानंतर मी तसंच केलं. या संपूर्ण घटनेनंतर नवरदेवाने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला आणि लग्न न करताच परतला. यानंतर प्रियकर खोटे दावे करत असल्याचं वधूच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तरुणाचे त्यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध नव्हते, असंही ते म्हणाले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न