प्रीतीचा आज वानखेडेमध्ये जबाब?
By Admin | Updated: June 24, 2014 09:09 IST2014-06-24T00:28:47+5:302014-06-24T09:09:29+5:30
अभिनेत्री प्रीती ङिांटाकडे मरिन ड्राइव्ह पोलीस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक उद्या वानखेडे स्टेडियममध्येच एकत्रितपणो चौकशी करू शकतात.

प्रीतीचा आज वानखेडेमध्ये जबाब?
>मुंबई : अभिनेत्री प्रीती ङिांटाकडे मरिन ड्राइव्ह पोलीस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक उद्या वानखेडे स्टेडियममध्येच एकत्रितपणो चौकशी करू शकतात.
उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. प्रीतीने दाखल केलेली तक्रार त्रोटक असल्याने या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी पोलिसांना तिचा पुरवणी जबाब नोंदवण्याची निकड भासली. तसा निरोप पोलिसांनी वकिलामार्फत तिच्यार्पयत पोहोचवला.
उत्तरादाखल तिनेही सहकार्य करण्याची तयारी पोलिसांकडे दर्शवली. उद्या पोलीस तिचा पुरवणी जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. हा जबाब वानखेडे स्टेडियममध्ये नोंदविला जाईल, असे सूत्रंकडून समजते. वानखेडे स्टेडियमच्या गरवारे स्टँडमध्ये दोनदा आणि मैदानात एकदा हा प्रसंग घडला.
हे प्रसंग नेमके घडले कुठे, त्या वेळी कोणकोण आसपास उपस्थित होते, प्रसंगांची नेमकी वेळ हे तपशील प्रीतीच्या तक्रारीत नव्हते. उद्या या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी
प्रीतीचा जबाब स्टेडियममध्ये नोंदवतील, असे सूत्रंकडून समजते. दरम्यान, 16 जून रोजी वाडिया कुटुंबीयांना गँगस्टर रवी पुजारीने प्रीतीची कड घेत धमक्या दिल्या. या प्रकरणी पुजारीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करते आहे. हे पथकही उद्या प्रीतीकडे पुजारीने वाडिया कुटुंबीयांना दिलेल्या धमक्यांबाबत चौकशी करू शकेल.