शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह जिहादची ना कायदेशीर व्याख्या, ना कोणत्याही गुन्ह्याची नोंद- गृह मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:28 IST

लव्ह जिहादचा एकही गुन्हा केंद्रीय यंत्रणांनी नोंदवलेला नाही; गृह मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली: लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नसल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं लोकसभेत दिली. लव्ह जिहादसारख्या कोणत्याही प्रकरणाची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी दिली नसल्याचं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणाची नोंद आपल्याकडे नसल्याचंदेखील गृह मंत्रालयाकडून लोकसभेत सांगण्यात आलं. केरळमध्ये लव्ह जिहादचं कोणतंही प्रकरण नसल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गृह मंत्रालयानं लिखित स्वरुपात उत्तर दिलं. लव्ह जिहादबद्दल गृह मंत्रालयानं लोकसभेत लिखित स्वरुपात दिलेल्या उत्तरात सध्याच्या कायद्यांचा उल्लेख आहे. 'लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नाही. केंद्रीय यंत्रणांकडेही लव्ह जिहादशी संबंधित कोणतीही माहिती नाही. केरळमध्ये दोन आंतरजातीय विवाहाची प्रकरणं समोर आली होती. याची चौकशी एनआयएकडून करण्यात आली होती,' असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत आंतरजातीय विवाहांची प्रकरणं समोर आली होती. त्यातलं हादिया प्रकरण देशभरात चर्चेत राहिलं होतं. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यामध्ये लव्ह जिहादचा विषय नसल्याचं समोर आलं. गेल्याच महिन्यात केरळमधल्या एका चर्चनं लव्ह जिहाद वास्तव असल्याचा दावा केला होता. दक्षिणेकडील राज्यांमधल्या ख्रिश्चन तरुणींना फसवून त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचं चर्चेनं म्हटलं होतं. विश्व हिंदू परिषदेनं चर्चच्या या विधानाचं स्वागत केलं होतं. लव्ह जिहाद केरळसाठी मोठं आव्हान असून त्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेनं करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच गृह मंत्रालयानं तुकडे तुकडे गँगबद्दलही अशीच माहिती दिली होती. तुकडे तुकडे गँगसंदर्भातली माहिती गृह मंत्रालयाकडे आरटीआयच्या माध्यमातून मागण्यात आली होती. त्यावर याबद्दलची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचं उत्तर गृह मंत्रालयानं दिलं होतं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी विरोधकांवर टीका करताना तुकडे तुकडे गँग या शब्दांचा वापर केला आहे.  

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादAmit Shahअमित शहाHome Ministryगृह मंत्रालय