भरदिवसा सव्वा लाखाचे दागिने लंपास आश्वी : खरशिंदे गावात घटना
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:34+5:302015-01-29T23:17:34+5:30
आश्वी : अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात घुसून सव्वा लाख रूपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना खरशिंदे गावात घडली. याप्रकरणी आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भरदिवसा सव्वा लाखाचे दागिने लंपास आश्वी : खरशिंदे गावात घटना
आ ्वी : अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरात घुसून सव्वा लाख रूपये किमतीचे ४ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना खरशिंदे गावात घडली. याप्रकरणी आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांची माहिती अशी, मंगळवारी दुपारी दोन वाजता अशोक मल्हारी भुसारी हे ज्वारी सोंगणीसाठी भाऊ व पत्नीसह शेतात गेले. घरी कुणी नसल्याने त्यांची आई शेजारी नातेवाईकाच्या घरी गेली होती. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने भुसारी यांच्या घरात घुसून लोखंडी पेटीची उचकापाचक करून सोन्याचा हार, कानातील झुबे व गंठणासह ६० रूपयांची चिल्लर असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भुसारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत आहेत. (वार्ताहर)