यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या विलंबाचा प्रभू स्वत: आढावा घेणार
By Admin | Updated: December 10, 2014 01:49 IST2014-12-10T01:49:35+5:302014-12-10T01:49:35+5:30
यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचा स्वत: आढावा घेणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खा. विजय दर्डा यांना दिली आहे.

यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या विलंबाचा प्रभू स्वत: आढावा घेणार
अधिका:यांना सूचना : खा. दर्डा यांना दिली माहिती
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
यवतमाळ-वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचा स्वत: आढावा घेणार असल्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खा. विजय दर्डा यांना दिली आहे.
गेल्या महिन्याभरात खा. दर्डा यांनी सुरेश प्रभू यांच्यासोबत झालेल्या काही भेटींमध्ये रेल्वे उद्यान तसेच यवतमाळ- वर्धा- नांदेड रेल्वेमार्गाच्या विस्ताराबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिका:यांना यापूर्वीच दिल्या आहेत. याबाबत आदेश देण्यात आल्यानंतर खा. दर्डा यांनी यांत्रिकी सदस्य व्ही. के. गुप्ता तसेच कार्यकारी संचालक (वर्क्स) प्रकाश डुडेजा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. प्रकल्पाला विलंब होण्याचे कारण काय? त्यातून बाहेर कसे पडायचे यावर ही चर्चा केंद्रित होती.
सातत्याने पाठपुरावा : खा. दर्डा यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि मागणी रेटून धरल्याचे पाहता प्रभू यांनी या प्रकल्पाला गती देण्यासंबंधी मार्ग शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधला जात असून या प्रकल्पाशी निगडित कोणत्या कामांमध्ये राज्य सरकार भागीदारी सुनिश्चित करणार हे जाणून घेतले जात आहे. खा. दर्डा यांनी किमान एक दशकापासून हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी संघर्ष चालविला आहे. या 27क् कि.मी. लांब रेल्वेमार्गामुळे केवळ विदर्भातील अतिमागास भागाचीच नव्हे तर यात्रस्थळ असलेले नांदेड, ज्यांच्या कार्याची जगभरात ओळख आहे असे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धेची वेगळी ओळख निर्माण होईल. तेथील जनतेमधील दळणवळण अधिक सुलभ होईल.