शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'गडकरी आणि RSS आखताहेत मोदींच्या हत्येचा कट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 09:02 IST

मोदींची हत्या करून मुस्लीम किंवा कम्युनिस्टांवर बालंट आणायचे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखत असल्याचा गंभीर आरोप शनिवारी 'जेएनयू'तील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला. मात्र, नितीन गडकरींनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर काही वेळातच शेहला रशीद यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले.शेहला रशीद यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये म्हटले होते की, संघ आणि गडकरी मोदींच्या हत्येचा कट आखत असल्याचे दिसतेय. मोदींची हत्या करून मुस्लीम किंवा कम्युनिस्टांवर बालंट आणायचे. त्यानंतर जमावाकडून मुस्लिमांच्या कत्तली करत सुटायचे, असा संघ आणि गडकरींचा डाव असल्याचे  रशीद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती. नितीन गडकरी यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत ट्विटरवरूनच शेहला रशीद यांना अप्रत्यक्षपणे कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. माझ्यावर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचत असल्याचा आणि अद्वातद्वा बोलणाऱ्या समाजविघातक शक्तींविरोधात मी कायदेशीर कारवाई करेन, असे ट्विट गडकरींनी केले. बेछूट आरोप करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवण्याचा गडकरींचा आजपर्यंतचा लौकिक पाहून शेहला रशीद यांनी काही वेळातच आपल्या विधानावरून माघार घेतली. मी हे विधान केवळ उपहासाने केले होते, अशा आशयाचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जगातील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला केवळ एका उपहासात्मक ट्विटमुळे इतका राग येतो. मग विचार करा, प्रसारमाध्यांना हाताशी धरून उमर खालिदसारख्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात मोहीम चालवण्यात आली, तेव्हा त्यांचे काय झाले असेल, असे शेहला रशीद यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitin Gadakriनितिन गडकरीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ