शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बघावं ते नवलच! इच्छापूर्तीनंतर भक्त अर्पण करतात चपलांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 13:03 IST

मंदिरात जाताना चपला बाहेर काढून जाण्याची पद्धत आहे. मंदिरात जाऊन देवाचा दर्शन घेताना भक्त श्रद्धेने चपला बाहेर काढतात.

ठळक मुद्देमंदिरात जाताना चपला बाहेर काढून जाण्याची पद्धत आहे. मंदिरात जाऊन देवाचा दर्शन घेताना भक्त श्रद्धेने चपला बाहेर काढतात. कर्नाटकातील एक फेस्टिव्हलपाहून सगळ्यांनाच नवल वाटेल.कर्नाटकातील लोक अद्भूत असा फूटवेअर फेस्टिव्हल साजरा करतात.

बंगळुरू- मंदिरात जाताना चपला बाहेर काढून जाण्याची पद्धत आहे. मंदिरात जाऊन देवाचा दर्शन घेताना भक्त श्रद्धेने चपला बाहेर काढतात. पण कर्नाटकातील एक फेस्टिव्हलपाहून सगळ्यांनाच नवल वाटेल. कर्नाटकातील लोक अद्भूत असा फूटवेअर फेस्टिव्हल साजरा करतात. वर्षातून दोन दिवस हा सोहळा पार पडतो. देवीकडे मागितलेली इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्तांकडून देवीला चपलांचा हार अर्पण केला जातो. 

नुकतंच कर्नाटकमध्ये हा अनोखा उत्सव पार पडला. अलांद तालुकमधील गोला गावात असलेल्या लकम्मा देवी (लक्ष्मी देवी) मंदिरात मंगळवारी शेकडो भक्तांनी एकत्र येऊन हा फेस्टिव्हल साजरा केला. कलाबुरगी आणि शेजारील जिल्ह्यातून हजारो भाविक या देवीच्या मंदिरात एकत्र आले होते. अनोखं नाव आणि पद्धत असलेल्या या फेस्टिव्हलसाठी भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. कर्नाटकातील लकम्मा देवीच्या मंदिराच दरवर्षी दिवाळीच्या सहा दिवसांनी हा फेस्टिव्हल साजरा होता. यावेळी प्रत्येक जाती-धर्माचे लोक एकत्र येतात आणि देवीकडे आपली इच्छा मागतात. भाविकांची इच्छापूर्ती झाल्यावर चपलांचा हार मंदिराच्या बाहेर असलेल्या झाडाला बांधला जातो. भाविकांकडून देवीला शाखाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा नैवेद्यही दाखविला जातो. तसंच भाविकांकडून देवीला साडी अर्पण केली जाते.

देवी चपला घालते आणि वाईट शक्तींपासून लोकांचा बचाव करते आणि आरोग्याच्या समस्या दूर करते, असं मत एका भाविकाने व्यक्त केलं आहे.  

टॅग्स :TempleमंदिरKarnatakकर्नाटक