जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहा : खेडकर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:18+5:302015-02-18T00:13:18+5:30

जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहा : खेडकर
>तळेगाव ढमढेरे : प्रतिकूल परिस्थितीतून व संघर्षातून माणसे घडत असतात. युवकांनी संघर्षाला सामोरे जाऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी केले.येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खेडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी कौस्तुभ गुजर होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, विजय ढमढेरे, विद्या सहकारी बॅँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रतिभा खेडकर, सरपंच अनिल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पवार, कविता मावळे, प्राचार्य पी. आर. पाटील, प्रा. पराग चौधरी उपस्थित होते.या वेळी वर्षभरात विविध स्पर्धा व उपक्रमांचे प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.०००००