देशातील सर्वात लांब बोगदा काश्मीरमध्ये!

By Admin | Updated: July 14, 2015 03:17 IST2015-07-14T03:17:34+5:302015-07-14T03:17:34+5:30

देशातीलच नव्हे, तर दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे जम्मू ते श्रीनगर हे २९३ कि.मी.चे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे.

The longest tunnel in the country! | देशातील सर्वात लांब बोगदा काश्मीरमध्ये!

देशातील सर्वात लांब बोगदा काश्मीरमध्ये!

- रघुनाथ पांडे, उधमपूर (जम्मू)
देशातीलच नव्हे, तर दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे जम्मू ते श्रीनगर हे २९३ कि.मी.चे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. मार्च महिन्यात याचे लोकार्पण होईल. आणखी १४ किलोमीटरचा नियोजित जोजीला बोगदा पूर्ण झाल्यास हे अंतर तब्बल ९० कि.मी.ने कमी होईल.
उधमपूरपासून ४० किलोमीटर अंतरावरील नाथा टॉप या कणखर दगडी डोंगराच्या पोटात अकराशे मीटर खोल असलेल्या ९ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याची साडेचार किलोमीटरची दोन टोके मधोमध सांधणारा अखेरचा सुरुंग स्फोट सोमवारी दुपारी करण्यात आला. जमिनीला प्रचंड हादरे देत दोन डोंगरांना जोडलेली अडीच मीटर जाडीची दगडी दरड कोसळली व क्षणात हा बोगदा सलग झाला. हा स्फोट केल्यानंतर १० तासांचा जम्मू- श्रीनगर प्रवास साडेतीन तासांवर आणण्याचा निर्धार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हिवाळ््यातील बर्फवृष्टी आणि पावसाळ््यातील धुवाधार अतिवृष्टीतून निर्विघ्न प्रवास साध्य करणारा हा बोगदा आधुनिक बांधकाम शैलीचा नमुना असल्याने पर्यटक तो बघण्यासाठी येतील, असे अनुमान आहे. श्रीनगरहून जम्मूकडे येताना वन-ए या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते; शिवाय वातारणातील अनेक समस्यामुळे वाहने अडून राहतात. या बोगद्यामुळे हे प्रकार टळू शकतील, असे गडकरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.


2011 पासून काम सुरू
27 लाख रुपयांची वार्षिक इंधन बचत अपेक्षित
20 फुटांचा दुसरा बोगदा या बोगद्याला समांतर असून, त्यामधे वाहन व प्रवासी आपत्कालीन सुविधा
29 ठिकाणी हा बोगदा मुख्य बोगद्यासोबत जोडला असून तिथे बसविलेली स्वयंचलित यंत्रणा वाहन दुरुस्ती ते रु ग्णवाहिका अशा सर्व सुविधा पुरविणार आहे.
3700 कोटी रुपयांचा प्रकल्प
400 अभियंते आणि 2400 कामगार 3 शिफ्टमध्ये अहोरात्र कार्यरत.
03 तास प्रवासाचे वाचतील.
04 किलोमीटरचा बोगदा मागील वर्षभरात पूर्ण.
03 वर्षात साडेपाच किलोमीटर बांधकाम झाले होते.

Web Title: The longest tunnel in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.