शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

काय सांगता? कांदा फक्त 35 रुपये किलो; 'या' ठिकाणी लागल्या लांबच लांब रांग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 09:31 IST

देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे.

ठळक मुद्देबिहार आणि पाटणामध्ये कांदे 35 रुपये प्रती किलो या भावाने विकले जात आहेत. स्वस्त दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांनीही लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बिस्कोमानने शहरात ठिकठिकाणी कांद्याची विक्री करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहेत.

नवी दिल्ली - देशात कांद्याचे दर प्रती किलो शंभर रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्यांचे 'किचन बजेट' बिघडले आहे. कांद्याचे भाव वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मात्र बिहार आणि पाटणामध्ये 35 रुपये प्रती किलो कांदा विकला जात असल्याने तेथील लोकांना दिलासा मिळाला आहे. स्वस्त दरात कांदे घेण्यासाठी सकाळपासूनच लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार आणि पाटणामध्ये कांदे 35 रुपये प्रती किलो या भावाने विकले जात आहेत. बिहारमधील सहकारी संघटना (Biscomaun) ने कांद्याच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या लोकांना दिलासा म्हणून स्वस्त दरात कांदा विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. स्वस्त दरात कांदा मिळत असल्याने नागरिकांनीही लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बिस्कोमानने शहरात ठिकठिकाणी कांद्याची विक्री करण्यासाठी काऊंटर सुरू केले आहेत. एका व्यक्तीला 35 रुपये किलो या दराने फक्त दोन किलो कांदे दिले जात आहेत. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमटीसी ही केंद्र सरकारची व्यापारी संस्था कांदा आयात करेल तर नाफेडच्या माध्यमातून भारतातील बाजारपेठांमध्ये त्याचे वितरण होईल अशी घोषणा केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र अद्यापही अनेक भागात कांद्याच्या दराने शंभरी गाठलेली आहे. तर काही ठिकाणी कांद्यावरून राजकारण सुरू झाले आहे. 

उत्पादन घटल्यामुळे गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर सातत्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीच कांदा शंभर रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला असून देशाच्या अन्य भागांमध्ये 80 रुपये प्रती किलोपर्यंत भाव वाढलेले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. गुजरात व दक्षिणेकडील राज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याला 6017 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उपबाजारात 78 वाहनांमधून 1600 क्विंटल कांद्याची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत अनपेक्षित तेजी आली. सध्या गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच दक्षिणेकडील राज्यात कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :onionकांदाBiharबिहार