जळकोट कृउबासाठी दुरंगी लढत
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30
जळकोट : जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे प्रचारास वेग आल्याचे दिसून येत आहे.

जळकोट कृउबासाठी दुरंगी लढत
ज कोट : जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे प्रचारास वेग आल्याचे दिसून येत आहे. जळकोट बाजार समितीची स्थापना होऊन नऊ वर्षे उलटली आहेत. या कालावधीत बाजार समितीचा कारभार हा प्रशासकीय मंडळाकडे होता. यंदा प्रथमच बाजार समितीची निवडणूक लागली आहे. जळकोट बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत असली, तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करून १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. तर भाजप आणि शिवसेना युतीनेही १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. उमेदवारी न मिळालेल्या दहा जणांनी आपली स्वतंत्र चूल मांडल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस या निवडणुकीस रंग भरत आहे. त्यामुळे प्रचाराचा वेग वाढल्याचे पहावयास मिळत आहे.४जळकोट बाजार समितीसाठी ११२१ मतदार आहेत. आता १६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सध्या बाजार समितीवर २६ लाख रुपयांचे कर्ज आहे. या निवडणुकीत विजयी होणार्यांना कर्ज फेडण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.