शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 20:50 IST

'राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे असू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये.'

नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधी यांनी भारतीय लष्करातील जवानांसाठी 'मारहाण'('पिटाई') असा शब्द वापरला होता. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी या वादावर आक्षेप घेत लोकसभेत उत्तर दिले आहे. भारतीय लष्करासाठी मारहाणीसारखे शब्द वापरणे योग्य नसल्याचे जयशंकर यांनी ठणकावले. 

जयशंकर यांची नाराजीपरराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, मी ऐकले आहे की काही लोक माझ्या शहाणपणावर शंका घेत आहेत. अशा टीकेमुळे मला काही फरक पडणार नाही. पण, जवानांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले जाऊ नये. आमचे जवान 13000 फूट उंचीवर सीमेचे रक्षण करत आहेत. त्यांना मारहाण सारखे शब्द वापरणे योग्य नाही. हा शब्द त्यांच्यासाठी वापरू नये. राहुल यांनी या मुद्द्यावर सरकार उदासीन असल्याचा आरोप केला होता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती.

लष्कराचा अपमान नको...जयशंकर पुढे म्हणाले, आम्ही चीनबाबत उदासीन असतो तर सीमेवर सैन्य का पाठवले असते का? जर आपण उदासीन असतो, तर आपण डी-एस्केलेशन आणि डिसेंगेजमेंटबद्दल का बोलू? चीनशी आमचे संबंध सामान्य नाहीत, असे आपण का म्हणतो? राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे राहू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमा वादावर सविस्तर भाष्य केले होते. भारत सरकार झोपले आहे आणि चीन सातत्याने आक्रमक धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. चीनच्या मुद्द्याकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. भारत सरकार झोपले आणि चीन युद्धाच्या तयारीत आहे. चीनने आपला 2 हजार किमी चौरस व्यापला आहे आणि आपल्या सैनिकांना मारहाण करत आहे, असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. 

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीIndian Armyभारतीय जवान