शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 10:13 IST

PM Modi On Press Conference : पत्रकार परिषद न घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

PM Narendra Modi: गेल्या १० वर्षांच्या सरकारच्या  काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होताना दिसतो. २०१४ पासून मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडलं आहे. एक मुलाखतीमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींन पत्रकार परिषद न घेण्याबाबत भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. मात्र मोदींनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत अशी टीका विरोधकांकडून होत आहे. अशातच इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, असं म्हणत आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले आहेत असं मोदींनी सांगितले.

"काहीही करू नका, फक्त त्यांनाच सांभाळा, तुमचा मुद्दा सांगा मग तो देशभरात जाईल, अशी संस्कृती आता आपल्या माध्यमांमध्ये निर्माण झाली आहे. आतापर्यंत असे होत होते की, माध्यमांच्या प्रतिनिधिंना मॅनेज करून काहीही बोलले तरी ते देशभरात पोहोचत होते, पण मला त्या वाटेने जायचे नाही. मला कष्ट करायचे होते, गरीबांच्या घरापर्यंत मला पोहोचायचे होते. विज्ञान भवनात रिबिन कापल्यानंतर फोटो काढून प्रसिद्धी मिळवू शकलो असतो. पण मी झारखंडमध्ये छोट्याश्या जिल्ह्यात जाऊनही योजनेचे काम करतो. मी एक नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. माध्यमांना ती संस्कृती योग्य वाटली तर त्यांनी ती मांडावी.  ही संस्कृती योग्य नसले तर माध्यमे त्यांना हवं ते करू शकतात," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"दुसरी गोष्ट म्हणजे मी संसदेला उत्तरदायी आहे. मी तिथे सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी तयार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे प्रसारमाध्यमे आज पूर्वीसारखी राहिली नाहीत. याआधी मी एखाद्या माध्यम संस्थेशी बोलतोय, असेच वाटायचं. पण आता तसे होत नाही. आता त्या माध्यम संस्थेतील कोणत्या पत्रकाराशी बोलतोय, हे लोक पाहतात. ज्या पत्रकाराशी मी बोलतो तो पत्रकार सोशल मीडियावर काय लिहितो, हे लोकांना माहीत असतं. त्यामुळे माध्यमे आता वेगळी राहिलेली नाहीत. पत्रकारांनाही इतरांप्रमाणेच राजकीय भूमिका आहेत हे लोकांना माही पडलं आहे," असेही मोदी म्हणाले.

"पूर्वी माध्यमाचे एकच साधन होते, पण आज अनेक आहेत. पूर्वी तुम्ही मीडियाशिवाय जाऊ शकत नव्हतात. आज संवादाची अनेक माध्यमे आहेत. आज माध्यमांशिवायही जनता आपला आवाज व्यक्त करू शकते. मीडियाशिवाय कोणतीही व्यक्ती त्याचे उत्तर देऊ शकते," असं मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा