शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'अब की बार 400 पार...', BJP च्या राष्ट्रीय अधिवेशनातून PM मोदींनी फुंकले लोकसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 15:18 IST

'आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक, त्यांच्याप्रमाणे आमचेही ध्येयावर लक्ष.'

PM Narendra Modi in BJP Convention: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवार (18 फेब्रुवारी 2024) रोजी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय अधिवेशनात कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा दिली, तसेच पुढील 100 दिवस उत्साहाने काम करण्याचे आवाहनही केले. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'मी येथे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. भाजप कार्यकर्ते वर्षातील प्रत्येक दिवशी, 24 तास देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी करत राहतात. पण आता पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासाने काम करायचे आहे. प्रत्येक नवीन मतदार, प्रत्येक लाभार्थी, प्रत्येक वर्ग, समाज, पंथ, परंपरा या सर्वांपर्यंत पोहोचावे आणि सर्वांचा विश्वास संपादन करावा. सर्वांनी प्रयत्न केल्यावर भाजपला जास्तीत जास्त जागा मिळून आणखी देशसेवा करता येईल.'

'अयोध्येची 5 शतकांची प्रतीक्षा संपवली, कलम 370 हटवले...'पंतप्रधान पुढे म्हणाले की, 'गेल्या दहा वर्षांत देसात जे काही कामे झाली, ते मैलाचा दगड आहे. अजून देशासाठी खूप काही साध्य करायची स्वप्ने आणि निर्णय बाकी आहेत. मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरुन देशातील शौचालयांवर भाष्य केले, महिलांच्या बाजूने बोललो, देशात विश्वकर्मा योजना सुरू केली. शतकानुशतके प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून 5 शतकांची प्रतीक्षा संपवली. गुजरातमधील पावागडमध्ये 500 वर्षांनंतर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. 7 दशकांनंतर आम्ही करतारपूर साहिब महामार्ग खुला केला आहे. 7 दशकांच्या प्रतीक्षेनंतर देशाला कलम 370 मधून स्वातंत्र्य मिळाले आहे.'

'विरोधकही म्हणतात- एनडीए 400 पार'गेल्या 10 वर्षात भारताने जी गती गाठली, मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचे धाडस दाखवले, ते अभूतपूर्व आहेत. भारताने प्रत्येक क्षेत्रात जी उंची गाठली, त्याे प्रत्येक देशवासीयाला एकत्र केले. आता देश ना छोटी स्वप्ने पाहतो ना छोटे संकल्प करतो. आता देशाची स्वप्नेही मोठी असतील आणि संकल्पही प्रचंड असतील. हाच विकसित भारताचा संकल्प आहे. आज विरोधी पक्षाचे नेतेही एनडीए सरकार 400 पारच्या घोषणा देत आहेत. एनडीएला 400 चा टप्पा पार करण्यासाठी भाजपला 370 चा टप्पा पार करावा लागेल,' असेही मोदी यावेळी म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख'आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांनी सत्तेचा उपभोग न घेता आपले ध्येय चालू ठेवले. त्याचप्रमाणे सरकार आपले ध्येय गाठण्यावर लक्ष देत आहे. आज भाजप युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांची शक्ती घडवण्याचे काम करत आहे. ज्यांना कुणीच विचारले नाही, त्यांना आम्ही विचारले अन् जवळ केले. येणाऱ्या काळात देशातील महिलांना संधी मिळतील. मिशन शक्ती देशातील महिला शक्तीच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी एक संपूर्ण परिसंस्था निर्माण करेल. 15 हजार महिला बचत गटांना ड्रोन मिळेल, ज्याद्वारे ड्रोन दीदी शेतीत वैज्ञानिकता आणि आधुनिकता आणतील. देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे कामही सरकार करत आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेस