शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, जे हवं ते बिनधास्त मागा; नितीन गडकरींची बिहारमध्ये 'काम की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 09:59 IST

केंद्रीय नितीन गडकरी यांनी बिहारच्या एका सभेत कोणीही मी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही असं सांगू शकत नाही असं म्हटलं आहे.

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी कायमच ओळखले जातात. त्याच्या मंत्रालयाच्या कामाच्या बाबतीतही ते कठोर भूमिका घेत असतात. आपल्या भाषणांदरम्यानही ते अनेकदा आपल्या कामांबाबत याचा उल्लेख करतात. अशातच आता नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु झालीय. नितीन गडकरी यांनी बिहार येथील निवडणूक सभेला संबोधित केले. नितीन गडकरींनी ही घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही, असे कोणत्याही आईचा मुलगा म्हणू शकत नाही, असे निती गडकरी यांनी म्हटलं आहे.

यावेळी बिहारमधील बेगुसरायमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीचे राजकारण करणाऱ्यांनाही फटकारले. जो कोणी जातीबद्दल बोलेल त्याला लाथ मारली जाईल. जनतेचा प्रश्न अन्न, वस्त्र आणि निवारा आहे. ज्या दिवशी हे सर्वांना मिळेल त्या दिवशी माझे काम पूर्ण होईल, असं गडकरी म्हणाले. नितीन गडकरी बेगुसराय येथील भाजपचे उमेदवार गिरिराज सिंह यांच्या प्रचारासाठी बागडोब येथे बोलत होते.

माझ्याकडे पैशांची कमी नाही. माझ्या हातात द्रौपदीचे ताट आहे, जे कधीही रिकामे नसते. मी सांगतो ते करतो. निवडणुकीनंतर गंगा नदीवरील शामो-मटिहाणी पुलाचे काम सुरू होईल. बेगुसरायचे खासदार गिरीराज सिंह यांच्या विनंतीवरून हा पूल बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वांगीण विकास होत आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांचाही विकास झाला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान, मंत्री गिरीराज सिंह यांनी मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो असं म्हटलं होतं. त्यावरच बोलताना नितीन गडकरी यांनी मी जाती धर्माचे राजकारण करत नाही असं म्हटलं. "मी जाती-धर्माचे राजकारण करत नाही. माझे राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर आधारित आहे. जाती-धर्माचे राजकारण करणाऱ्यांचा मला तिरस्कार आहे. तुम्ही माझ्याकडून मागण्यात कंजूषपणा करू नका. तुम्ही जे मागाल ते मी पूर्ण करीन," असंही गडकरींनी म्हटलं.

मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो - गिरीराज सिंह

"लोक म्हणतात की गिरिराज सिंह हिंदू-मुस्लिम राजकारण करतात. मी हिंदू-मुस्लिम राजकारण करतो हे मला मान्य आहे. पण मी विकासाचेही राजकारण करतो. माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपये खर्चून बेगुसरायचा विकास झाला आहे," असं गिरीराज सिंह म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी