भाजपकडून कर्नाटकातील २० उमेदवारांची घोषणा, अनेक दिग्गज नावांचा समावेश; वाचा सविस्तर यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:06 PM2024-03-13T20:06:18+5:302024-03-13T20:07:30+5:30

भाजपाने आज बुधवारी १३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत ७२ नावे जाहीर करण्यात आली आहेत.

loksabha election BJP announces 20 candidates from Karnataka, includes many big names; Read the detailed list | भाजपकडून कर्नाटकातील २० उमेदवारांची घोषणा, अनेक दिग्गज नावांचा समावेश; वाचा सविस्तर यादी

भाजपकडून कर्नाटकातील २० उमेदवारांची घोषणा, अनेक दिग्गज नावांचा समावेश; वाचा सविस्तर यादी

भाजपाने आज बुधवारी १३ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत ७२ नावे जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांना हिमाचलमधील हमीरपूरमधून तिकीट मिळाले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी कर्नाटकातील धारवाडमधून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

दुसऱ्या यादीत भाजपचे केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून १, दिल्लीतून २, गुजरातमधून ७, हरियाणातून ६, हिमाचल प्रदेशातून २, कर्नाटकातून २०, मध्य प्रदेशातून ५, महाराष्ट्रातील २०, तेलंगणामधून ६ उमेदवार आहेत.  त्रिपुरातून ६. उत्तराखंडमधून १ उमेदवार तर २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

कर्नाटकातील उमेदवारांची यादी

१) चिक्कोडी- श्री अन्नासाहेब शंकर जोल्ले 
२) बागलकोट- श्री पी.सी. गद्दीगौडर
३) बीजापूर - श्री रमेश जिगजिणगी 
४) गुलबर्गा- डॉ. उमेश जी जाधव 
५) बीदर- श्री भगवंत खूबा 
६) कोप्पल- डॉ. बसवाराज क्यावातूर 
७) बेल्लारी-  श्री बी. श्रीरामुलू
८)  हावेरी-  श्री बसवराज बोम्मायी
९) धारवाड- श्री प्रल्हाद जोशी
१०) दावणगेरे- श्रीमती गायत्री सिद्देश्वर
११) शिमोगा- उडुपी चिकमंगलूर 
१२)उड्डपी निमंगलूर- श्री कोटा श्रीनिवास पूजारी
१३) दक्षिण कन्नड- कॅप्टन ब्रिजेश चौटा
१४) तुमकूर- श्री वी सोमन्णा
१५) मैसूर- यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार
१६) चामराजनगर- एस बालराज
 १७)बंगळुरु ग्रामीण- सी एन मंजूनाथ
१८) बंगळुरु उत्तर- कुमारी शोभा करंदलाजे
१९) बंगळुरु सेंट्रल- पी.सी मोहन
२०) बंगळुरु दक्षिण- तेजस्वी सूर्या

Web Title: loksabha election BJP announces 20 candidates from Karnataka, includes many big names; Read the detailed list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.