शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Lokmat Parliamentary Awards: मला 56 इंची छाती दाखवण्यात काडीमात्र रस नाही; ओवेसींचा मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 17:35 IST

Lokmat Parliamentary Awards 2019 : देशभरात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन शरसंधान

https://www.lokmat.com/topics/lokmat-parliamentary-awards/नवी दिल्ली: एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींनी ५६ इंच छातीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मला ५६ इंच छाती दाखवण्यात काडीमात्र रस नाही. माझ्या आणि मोदींच्या फकिरीत जमीन अस्मानाचं अंतर आहे, असा टोला त्यांनी लगावला. सध्या देशात गाजत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरदेखील त्यांनी भाष्य केलं. ते लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. मी कोणत्याही ऑर्केस्ट्रा पार्टीचा गायक होऊ शकत नाही. मला मुशायरादेखील करायचा नाही. ५६ इंच छाती दाखवण्यात मला जरासाही रस नाही, अशा शब्दांत ओवेसींनी मोदींना चिमटा काढला. यावेळी त्यांनी मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणाबद्दलचं त्यांचं परखड मत मांडलं. 'तुम्हाला मी सांगत असलेली गोष्ट कदाचित कटू वाटेल. पण कधीकधी कटू गोष्टीदेखील ऐकायला हव्यात. तुम्ही मुस्लिम समुदायाला समजून घेत नाही, ही खरी समस्या आहे. तुम्हाला केवळ ईद आणि बकरी ईदच्या दिवशी त्यांची आठवण येते. सरकारला मुस्लिमांच्या समस्या समजून घ्यायच्या नाहीत. मुस्लिमांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा बदलल्या आहेत. मात्र राजकीय पक्षांना त्या अद्याप समजलेल्या नाहीत,' अशी खंत ओवेसींनी व्यक्त केली. मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. माझ्यावर कायमच तसे आरोप होतात. मला देशाचा नेता व्हायचं नाही. देशातील कमकुवत समाज घटकांना सक्षम करण्याचा माझा प्रयत्न आहे. दलित, मुस्लिम, आदिवासी समुदायांना देशाच्या भवितव्यासाठी सामर्थ्यवान करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सडकून टीका केली. राष्ट्राच्या आधारावर आपण नागरिकत्वाचा कायदा करत आहोत. मौलाना अब्दुल कलाम आझाद म्हणाले होते की, मी एक हिंदुस्थानी मुसलमान आहे, माझं या राष्ट्राशी 1 हजार वर्षांचं जुनं नातं आहे, याची आठवण ओवेसी यांनी करून दिली. मुसलमान असल्यानं आमचा त्या विधेयकात समावेश नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीम