शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'देधडक' देवेंद्र फडणवीस Vs. 'बेधडक' रजत शर्मा; पाहा लोकमतच्या फेसबुक पेजवर लाइव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 12:20 IST

येत्या काळात देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल, भाजपाची त्यात काय भूमिका असेल, याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं 'व्हिजन' आज ऐकायला मिळेल

ठळक मुद्देलोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा घेणार आहेत.'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रमात रजत शर्मा यांनी देशभरातील रथी-महारथींच्या मुलाखती घेतल्या आहेत. शरद पवार आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नवी दिल्लीः कुठल्याही प्रश्नाला अत्यंत मुद्देसूद उत्तरं देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  निडरपणे नेमके, थेट प्रश्न विचारणारे ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा आज 'लोकमत'च्या व्यासपीठावर आमनेसामने येणार आहेत. लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्याचं हे दुसरं वर्षं आहे. देशहिताकरिता विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या संसद सदस्यांना लोकमत पार्लमेंटरी अवॉर्डने सन्मानित केलं जातं. या पुरस्कार सोहळ्याचं औचित्य साधून आयोजित केलेल्या लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा घेणार आहेत. ही मुलाखत दुपारी ३.३० वाजता 'लोकमत'च्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहता येईल. 

महाराष्ट्राचा राज्यकारभार समर्थपणे सांभाळून, निवडणूक प्रचाराची धुरा यशस्वीपणे पेलून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे तरुण-तडफदार 'पोस्टर बॉय' झाले आहेत. स्वच्छ प्रतिमेच्या अभ्यासू नेत्यांच्या पंक्तीत त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांना केंद्रात बोलावलं जाऊ शकतं अशी चर्चाही अधे-मधे होत असते. या पार्श्वभूमीवर, येत्या काळात देशाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल, भाजपाची त्यात काय भूमिका असेल, पाच राज्यांतील निकालांकडे भाजपा कसा पाहतो आणि लोकसभा निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होईल, याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं 'व्हिजन' आज ऐकायला मिळेल. 

'आप की अदालत' या लोकप्रिय कार्यक्रमात रजत शर्मा यांनी देशभरातील रथी-महारथींच्या मुलाखती घेतल्या आहेत. प्रश्न विचारण्याची त्यांची शैली, नेत्यांना बोलतं करण्याची, हळूच टोमणा मारण्याची, त्यांच्याकडून नेमका मुद्दा काढून घेण्याची हातोटी यामुळे ते फडणवीस आणि त्यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगेल. 

पी. चिदंबरम Vs. बरखा दत्त

'लोकमत कॉन्ल्केव्ह'मध्येच धडाकेबाज पत्रकार म्हणून देशाला परिचित असलेल्या बरखा दत्त या माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची मुलाखत घेणार आहेत. त्यात, लोकसभा २०१९ या 'मिशन'कडे काँग्रेस कसं पाहतं, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची अर्थनीती, रिझर्व्ह बँकेतील घडामोडी, यावर चर्चा होईल. दुपारी ४.१५ वाजता ही मुलाखतही आपण 'लोकमत'च्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकाल. 

मुरली मनोहर जोशी, शरद पवार यांनी जीवनगौरव

दरम्यान,  लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी या दोघांनी दिलेल्या योगदानामुळे लोकमत पार्लमेंट ज्युरी बोर्डाने त्यांची एकमताने निवड केली. हे दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात होते व प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले होते.

English summary :The 'Lokmat Parliamentary Award' ceremony has been organized on Thursday, 13th October, to honor the veterans from political field who have contributed immensely to the strengthening of democracy of India. Union Home Minister Rajnath Singh, Commerce and Industry Minister Suresh Prabhu, Union Human Resource Development Minister Prakash Javadekar, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and former Union Minister Farooq Abdullah will be present in the award ceremony by Lokmat Media. 'Lokmat Parliamentary Award' will given by Vice President Venkaiah Naidu.

टॅग्स :Lokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारRajat Sharmaरजत शर्मा