शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Lokmat Parliamentary Awards 2018: प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे - व्यंकय्या नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 7:45 PM

देशातील लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : देशातील लोकांनी आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत  उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी अतुलनीय योगदान देणाऱ्यांचा लोकमत संसदीय पुरस्काराने सन्मान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीतील समारंभात करण्यात आला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बोलत होते. 

लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकमत परिवाराचे अभिनंदन केले. तसेच, संसदेसाठी शरद पवार यांनी 52 वर्षांचे योगदान दिल्यामुळे त्यांचे कौतुक केले. लोकमत ग्रुपने पुरस्कारांसाठी योग्य खासदारांची निवड केल्यामुळे मी खूप खुश असल्याचेही ते म्हणाले. 

सर्वांनी आपल्या मातृभाषेचा आदर राखला पाहिजे. लोकांनी आपापल्या भाषेतच बोललं पाहिजे. मग, ती कोणतीही भाषा असो. मराठी, गुजराती, कन्नड, पंजाबी, काश्मीरी असो प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतच बोललं पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मांडले. तसेच, ते म्हणाले मातृभाषेनंतर इतर भाषेत बोला. परदेशात जा शिका, परत या पण मातृभाषेत बोला.   

दरम्यान, यावेळी लोकमत संसदीय पुरस्कारातील जीवनगौरव पुरस्कार खा. शरद पवार (राज्यसभा) व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी (लोकसभा) यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील भाजपा सदस्य निशिकांत दुबे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर, संसदेत संस्मरणीय कामकाज करणा-या श्रीमती कणिमोळी, हेमा मालिनी, श्रीमती रमा देवी, छाया वर्मा या महिला खासदारांनाही लोकमत संसदीय पुरस्काराने गौरविण्यात आले. 

टॅग्स :Lokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू