लोकमत आपल्या दारी : बाहेरच्या वाहनांनी अडविले रस्ते महापालिका: पार्किंगची समस्या, गल्लीतील रस्त्यांची लागली वाट
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
अहमदनगर: शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या या प्रभागातील रस्ते बाहेरच्या वाहनांनी अडविले आहेत. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर वाहने उभी राहत आहेत. मुख्य रस्ते बरे दिसत असले तरी गल्लीबोळातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.

लोकमत आपल्या दारी : बाहेरच्या वाहनांनी अडविले रस्ते महापालिका: पार्किंगची समस्या, गल्लीतील रस्त्यांची लागली वाट
अ मदनगर: शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या या प्रभागातील रस्ते बाहेरच्या वाहनांनी अडविले आहेत. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर वाहने उभी राहत आहेत. मुख्य रस्ते बरे दिसत असले तरी गल्लीबोळातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. टीम लोकमतने प्रभाग २१ मध्ये मंगळवारी पाहणी केली, त्यात हे वास्तव समोर आले. घुमरे गल्ली, गुजर गल्ली, महाजन गल्ली परिसरात टीम लोकमतने पाहणी केली असता नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. पिण्याचे पाणी व पथदिव्यांची समस्या मात्र या भागात नाही. पिण्याचे पाणी येते, मात्र ते पुरेशा दाबाने येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. नवीपेठ, बाजारपेठेलगत असलेल्या घुमरे गल्लीतील रस्त्यांवर बाहेरगावाहून येणारी वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ड्रेनेज साफ करणारे महाालिकेचे कर्मचारी बोलविल्याशिवाय येत नसल्याची तक्रार महिलांनी मांडली. घुमरे गल्लीतील बेडेकर यांच्या बाजूला असलेल्या बोळीतील रस्ता वर्षापूर्वी खोदण्यात आला. ड्रेनेज व पाईपलाईनचे काम केले, मात्र खोदलेला रस्ता अजूनही दुरूस्त करण्यात आलेला नाही. बारा-पंधरा कुटुंबांसाठीचा हा रस्ता असून चारचाकी वाहन या बोळीत जाऊ शकत नाही. फ्लॅटधारकांना वाहने रस्त्यांवरच पार्किंग करावी लागतात. रंगारगल्लीतील एस.टी.महाले मंगल कार्यालयाला रंगरंगोटी करण्यात आली, भेगाळलेल्या भिंती मात्र तशाच आहेत. धोकादायक भिंतीच्या आतमध्ये उत्साही वातावरणात मंगल कार्य जीव धोक्यात घालून पार पाडली जातात. नगरसेवक किशोर डागवाले यांचे कार्यालय तेथेच आहे. छोट्या-मोठ्या समस्या महापालिकेकडून सोडविण्यास चालढकल केली जाते, त्यामुळे बहुतांश नागरिक डागवाले यांच्या कार्यालयात समस्या घेऊन जातात. .............प्रतिक्रिया जोड आहे.