शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विचारपूर्वक बोला, वादापासून दूर राहा; लोकसभेपूर्वी पीएम मोदींच्या सर्व भाजप नेत्यांना सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 23:06 IST

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक झाली.

Lok Sabhe Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी(दि.3) राजधानी दिल्लीत भाजपच्या मंत्री परिषदेची बैठक झाली. ही बैठक सुमारे 8 तास चालली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला. तसेच, डीपफेक व्हिडिओ आणि ऑडियोपासून सावध राहण्यासही सांगितले. 

या बैठकीत पीएम मोदी सुमारे तासभर बोलले. यावेळी ते म्हणाले की, वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कोणालाही भेटताना विचारपूर्वक भेटा, विचारपूर्वक बोला. तुम्हाला बोलायचे असेल तर सरकारच्या योजनांवर बोला. सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही सरकारने केलेल्या विकासकामांचा जनतेसमोर उल्लेख करा, अशा सूचना मोदींनी आपल्या नेत्यांना दिल्या. 

कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावर्षी जूनमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प विकसित भारत दर्शवणारा असला पाहिजे. 2047 पर्यंत भारत विकसित देश कसा बनू शकतो, याविषयी सचिवांनी पंतप्रधानांना पाच सादरीकरणे दाखवली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, हरदीप सिंग पुरी, किरेन रिजिजू, अर्जुन मेघवाल आणि पियुष गोयल यांनी सादरीकरणावर पंतप्रधान मोदींना आपल्या सूचना मांडल्या. भाजप आपल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्राच्या उपलब्धी आणि विकास योजनांवर भर देणार आहे. याबाबत मंत्रिपरिषदेच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना आणि गेल्या 5 वर्षातील कामगिरीवर चर्चा करण्यात आली.

विकसित भारत 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चायावेळी मंत्रिपरिषदेने विकसित भारत 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंट आणि पुढील 5 वर्षांच्या सविस्तर कृती आराखड्यावर चर्चा केली. यासह, मे 2024 मध्ये नवीन सरकारच्या स्थापनेनंतर त्वरित अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यासाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार करण्यात आला. विकसित भारताचा रोडमॅप हा 2 वर्षांपेक्षा जास्त काळ केलेल्या सखोल तयारीचा परिणाम आहे. यामध्ये सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारे, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग संस्था, नागरी समाज, वैज्ञानिक संस्थांशी व्यापक सल्लामसलत आणि तरुणांना त्यांची मते, सूचना आणि इनपुट जाणून घेण्यासाठी एकत्रित करणे यांचा समावेश असलेल्या संपूर्ण-सरकारी दृष्टिकोनाचा समावेश होता.    

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण