शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 19:04 IST

Lok Sabha Speaker : 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.

Lok Sabha Speaker : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झाले. आता 24 जून रोजी संसदेचे पहिले अधिवेशन सुरू होणार असून, यात सर्व नवनिर्वाचित लोकसभा सदस्य शपथ घेतील. यासोबतच 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. आतापर्यंत एनडीएने लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांनी लोकसभेत उपसभापतीपदाची मागणी केली आहे. सरकारने कोणत्याही विरोधी नेत्याला उपसभापती बनवण्यास नकार दिला, तर लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा इशाराही विरोधकांनी दिला आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी विरोधकांनी उमेदवार उभा केल्यास, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. 

दरम्यान, लोकसभा ही देशाची सर्वोच्च विधीमंडळ आहे. सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी सभापती निवडला जातो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, लोकसभेचा अध्यक्ष कसा निवडला जातो, त्याची कार्ये आणि अधिकार काय असतात आणि विशेषत: युती सरकारमध्ये हे पद इतके महत्त्वाचे का आहे? 

लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते?लोकसभा अध्यक्ष होण्यासाठी पहिली अट असते की, सभापती हा सभागृहाचा सदस्य असावा. याशिवाय अध्यक्षपदासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची तरतूद नाही. लोकसभेच्या अध्यक्षांसह पीठासीन अधिकाऱ्यांची आणि उपसभापतींची निवड सभागृहाच्या सदस्यांद्वारे साध्या बहुमताच्या आधारे केली जाते.

सहसा सत्ताधारी पक्षाचेच सदस्य सभापतीपदासाठी निवडले जातात. परंपरेप्रमाणे सत्ताधारी पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करतो. उमेदवार निश्चित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किंवा पंतप्रधान त्यांचे नाव सभापती पदासाठी प्रस्तावित करतात. त्यानंतर अध्यक्षाची निवड एकमताने केली जाते. मात्र, कोणत्याही नावावर सदस्यांचे एकमत नसेल, तर अशा स्थितीत सभापती निवडीसाठी मतदान केले जाते.

लोकसभा अध्यक्षांना काय अधिकार आहेतलोकसभेचे अध्यक्ष सभागृहाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. सभागृहाचे अध्यक्षच सदस्यांना बोलण्याची परवानगी देऊ शकतात. याशिवाय कोणत्याही सदस्याने सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्यास सभापती त्याचे सदस्यत्वही निलंबित करू शकतात. कोणत्याही प्रस्तावावर मतदानाच्या वेळीही अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. एखाद्या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांकडून समान मते पडली, तर अशा स्थितीत लोकसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. 

घटनादुरुस्तीनंतर अधिकार वाढले52 व्या पक्षांतर विरोधी घटनादुरुस्ती कायदा 1985 नंतर लोकसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात आणखी वाढ झाली आहे आणि त्यांची भूमिका खूप महत्वाची बनली आहे. या दुरुस्तीनुसार, पक्षांतर विरोधी कायद्यानुसार सभापती सदस्यांचे सदस्यत्वही रद्द करू शकतात. अशाप्रकारे सभापतींनाही न्यायिक अधिकार मिळाले आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा