शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने जारी केली अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 07:56 IST

सत्ताधारी भाजपनेही राहुल यांच्या वक्तव्याला ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

नवी दिल्ली : ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या कथित टिप्पणीसाठी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने तत्परतेने हालचाली करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व शुक्रवारी संपुष्टात आले. या निर्णयाने देशातील राजकारण ढवळून निघाले असून सर्व विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत या निर्णयाचा जोरदार विरोध सुरू केला आहे. सत्ताधारी भाजपनेही राहुल यांच्या वक्तव्याला ‘ओबीसींविरोधातील हल्ला’ असा रंग देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

राहुल गांधी (५२) हे केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. या निर्णयामुळे त्यांना ८ वर्षे निवडणूक लढता येणार नाही. अर्थात, उच्च न्यायालयाकडून सुरत न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत हे निर्देश लागू असतील. या निर्णयाविरुद्ध विरोधकांनी रान उठवले आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप काँग्रेससोबत असल्याचे दिसून आले. भाजपने विरोधकांचे आरोप फेटाळून लावले असून, अपात्रता कायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अधिसूचना जारी होण्याच्या काही तास आधी राहुल लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहिले. ते संसद संकुलात पक्ष खासदारांच्या बैठकीतही सहभागी झाले होते.

विरोधकांचा निषेध मोर्चा, ३० खासदार ताब्यातलोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत आणि अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची मागणी करत संसद भवनापासून निषेध मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांसह ३० विरोधी खासदारांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, के. सुरेश, मणिकम टागोर, इम्रान प्रतापगढी आणि मोहम्मद जावेद यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, असा दावा विरोधकांनी केला. कलम १४४चे उल्लंघन केल्याबद्दल विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक खासदारांना ताब्यात घ्यावे लागले, असे दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ताब्यात घेतलेल्यांना जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?

ज्येष्ठ वकील विकास सिंह, अध्यक्ष सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन - राहुल यांना अपीलीय न्यायालयाकडून आदेश मिळाल्यास त्यांना पुन्हा खासदार पद मिळविण्यास सभापतींकडे जाण्याचा अधिकार आहे.- वायनाडच्या पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने करण्यापूर्वी राहुल यांना वरिष्ठ न्यायालयात जाऊन शिक्षेला स्थगिती मिळवावी लागेल. - जर दोषसिद्धीला स्थगिती असेल तर त्यांचे सदस्यत्व परत मिळू शकते.

ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदीराहुल यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आल्याने अपात्रता बेकायदेशीर आहे. त्यांना दिलासा हवा असेल तर त्यांनी त्वरीत स्थगिती मिळवावी. 

ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथराखटला आता संपला आहे, दोषी ठरवले गेले आहे आणि शिक्षा झाली आहे आणि परिणामी अपात्रता लागू झाली आहे. दोषी ठरविण्यास स्थगिती मिळाल्यास राहुल गांधी यांना २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविता येऊ शकेल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMember of parliamentखासदार