शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 09:31 IST

गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : लोससभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुमबाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले आहे.  

गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असे प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी सावधानता अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पाच वाजता संपल्यानंतर, देशभरातील राजकीय वर्तुळात ज्याची प्रचंड उत्सुकता होती, ती म्हणचे एक्झिट पोल. विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सींनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून आणि तज्ज्ञांची मतं घेऊन जनतेचा कौल कुणाला, याचा अंदाज बांधला आहे. स्वाभाविकच, प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगवेगळे आहेत. परंतु, देशात 'फिर एक बार, मोदी सरकार' येईल, असेच बहुतांश एक्झिट पोलचे आकडे सांगताहेत. भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा ओलांडेल किंवा नाही, हे कुठल्याच एक्झिट पोलमध्ये सांगितले नाही. मात्र, भाजपाप्रणित एनडीए 300 जागांपर्यंत मजल मारू शकेल असे चित्र दिसत आहे. 

'लोकमत'च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत पाच प्रमुख एक्झिट पोलचे आकडे.

संस्थाभाजपा+काँग्रेस+अन्य
टाइम्स नाउ-व्हीएमआर306132104
सी व्होटर287128127
जन की बात305124113
एबीपी-नेल्सन267127140
न्यूज नेशन282-290118-126130-138
टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस