शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेच्या चुकीमुळे खासदारांना अच्छे दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 13:09 IST

निवडणूक भत्त्यापोटी खासदारांना 45 हजारऐवजी 70 हजार रुपये मिळतील.

नवी दिल्ली: सरकारी मालकीच्या बँकांमधील भोंगळ कारभारावर अनेकदा टीका होते. मात्र, काही दिवसांपूर्वी हाच कारभार लोकसभेतील काही खासदारांना सुखद धक्का देणार ठरला. 28 फेब्रुवारी रोजी खासदारांच्या खात्यामध्ये त्यांचे मासिक वेतन जमा झाले. मात्र, लोकसभेतील खासदार याबाबतीत अधिक भाग्यवान ठरले. या भाग्यवान खासदारांच्या बँक खात्यात चक्क दोन महिन्यांचा पगार जमा झाला होता. सुरुवातीला या गोंधळामुळे अनेकजण चक्रावून गेले. मात्र, त्यानंतर अधिक चौकशी केली असता या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला. लोकसभा सचिवालयाकडून या सगळ्याचा त्वरीत खुलासा करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडियाने काही खासदारांच्या खात्यात चुकून दोन महिन्यांचा पगार जमा केला. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर गुरुवारी बँकेने संबंधित खासदारांच्या खात्यातून हे पैसे कापून घेतले. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून बुधवारीच खासदारांच्या वेतनवाढीला मंजूरी देण्यात आली होती. येत्या 1 एप्रिलपासून खासदारांना वाढीव वेतन मिळेल. त्यामुळे निवडणूक भत्त्यापोटी खासदारांना 45 हजारऐवजी 70 हजार रुपये मिळतील. तर कार्यालयीन भत्त्यापोटी खासदारांना आता 60 हजार रुपये मिळतील. याशिवाय, फर्निचर भत्त्यापोटी मिळणारी 75 हजारांची रक्कम 1 लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केलेल्या घोषणेनुसार दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतनात महागाई दराप्रमाणे वाढ करण्यात येईल. 

सध्या एका खासदाराला मासिक ५० हजार रुपये वेतन, संसद अधिवेशनाला किंवा सभागृहाच्या कमिटीच्या बैठकीला हजर झाल्यास २००० रुपये दैनिक भत्ता दिला जातो.याशिवाय प्रत्येक महिन्याला ४५००० रुपये मतदारसंघ भत्ता, १५ हजार रुपये स्टेशनरी आणि ३० हजार रुपये खासदारांच्या सचिव साहाय्यकाच्या वेतनापोटी देण्यात येतो. त्यासोबतच खासदारांना सरकारी निवास, विमान व रेल्वे प्रवासात सवलत, दोन मोबाईल फोन आणि वाहन खरेदीसाठी चार लाखांपर्यंत कर्जही दिले जाते. 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाSBIएसबीआय